शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पाच्या मदतीला ‘व्हाट्स अ‍ॅप’

By admin | Updated: August 28, 2014 02:06 IST

एरव्ही प्रत्येक जण मोबाईलवर ‘व्हाट्स अ‍ॅप’मध्ये डोके खुपसून दिसत असले तरी हेच ‘व्हाट्स अ‍ॅप’ आता गणरायाच्या मदतीसाठी धावून येणार आहे. गणेश विसर्जनामुळे होणाऱ्या तलावांच्या प्रदूषणाला

विसर्जनातून होणारे प्रदूषण टाळा : मनपा पाठविणार दोन लाख मॅसेजनागपूर : एरव्ही प्रत्येक जण मोबाईलवर ‘व्हाट्स अ‍ॅप’मध्ये डोके खुपसून दिसत असले तरी हेच ‘व्हाट्स अ‍ॅप’ आता गणरायाच्या मदतीसाठी धावून येणार आहे. गणेश विसर्जनामुळे होणाऱ्या तलावांच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत जनजागृती सुरू केली आहे. यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली जाणार असून शहरातील दोन लाख नागरिकांना मोबाईलवर ‘व्हाट्स अ‍ॅप’ द्वारे जगजागृतीपर मेसेज पाठविले जाणार आहेत. यंदा सोनेगाव तलावात पुरेसा जलसाठा नाही. येथे मोठ्या मूर्तींचे विसर्जन होणार नाही. अंबाझरी तलावाच्या ओव्हरफ्लो भागात मूर्ती विसर्जनाची व्यवस्था केली जाणार आहे. पीओपी मूर्तींचे तलावात विसर्जन होऊ नये, यासाठी काळजी घेतली जात आहे. या मूर्तीच्या मागील बाजूला लाल निशाणी व दुकानासमोर विसर्जनासंदर्भात सूचना लिहिलेले बॅनर्स लावण्याच्या सूचना विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत. याचे उल्लंघन करणाऱ्या विके्रत्यांवर कारवाई करण्याचा इशारा आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)फुटाळाच्या स्वच्छतेसाठी १०० कर्मचारीनासुप्रने फुटाळा तलावाच्या काठावर चौपाटी निर्माण केली. परंतु संबंधित कंत्राटदार तलावाच्या सफाईकडे लक्ष देत नाही. लोकांच्या आरोग्याचा विचार करता, आरोग्य विभागाने तलावाची स्वच्छता हाती घेतली आहे. यासाठी १०० सफाई कर्मचारी लावण्यात आले आहेत. यावर होणारा खर्च नासुप्रकडून वसूल केला जाणार आहे. पीओपीच्या उपनियमांचा प्रस्ताव प्रलंबितपीओपी मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात मनपाने उपविधीचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविला आहे. दोनवेळा स्मरणपत्रे पाठविली, परंतु अद्याप हा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित आहे.