BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 12:12 IST2025-08-20T12:10:21+5:302025-08-20T12:12:13+5:30

Mumbai Rains: मुंबईत गेल्या दोन तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून सखोल भागात पाणी साचले आहे. परिणामी, नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

What to do if you get stuck somewhere during the monsoon? Important post from Mumbai Municipal Corporation! | BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

मुंबईत गेल्या दोन- तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी, रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे लोकांना तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. शिवाय, येत्या काही तासांत मुंबईत आणखी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून मुंबई आणि उपनगरीय भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केला असून महत्त्वाची माहिती दिली.

मुंबईत मुसळधार पाऊस
मुंबई शहर व उपनगरे क्षेत्रात मागील दोन दिवसांत अतिमुसळधार पाऊस कोसळला आहे. तसेच, बुधवार, दिनांक २० ऑगस्ट २०२५ च्या मध्यरात्रीपासून संततधार पाऊस सुरु आहे. सद्यपरिस्थितीत मुंबईतील जनजीवन सामान्य आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेसेवेसह 'बेस्ट' वाहतूक सुरळीतपणे सुरु आहे, अशी माहिती मुंबई महानगर पालिकेने दिली.

महानगरपालिकेची यंत्रणा सतर्क
पावसाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर अविरतपणे आणि तत्परतेने कार्यरत आहे. आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा सतर्क असल्याचेही मुंबई महानगर पालिकेने म्हटले आहे.

कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षात १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

Web Title: What to do if you get stuck somewhere during the monsoon? Important post from Mumbai Municipal Corporation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.