शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
4
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
5
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
6
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
7
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
8
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
9
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
10
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
11
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
12
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
13
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
14
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
15
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
16
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
17
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
18
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
19
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
20
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

निवारा केंद्रामधील मुलांच्या संरक्षणासाठी काय केले?

By admin | Updated: March 15, 2017 04:04 IST

निवारा केंद्रांमधील मुलींचे लैंगिक शोषण करण्याचे प्रकार महाराष्ट्रात वाढत आहेत, त्यामुळे येथील मुलांच्या संरक्षणार्थ राज्य सरकारने आतापर्यंत काय पावले उचलली आहेत?

मुंबई : निवारा केंद्रांमधील मुलींचे लैंगिक शोषण करण्याचे प्रकार महाराष्ट्रात वाढत आहेत, त्यामुळे येथील मुलांच्या संरक्षणार्थ राज्य सरकारने आतापर्यंत काय पावले उचलली आहेत? अशी विचारणा मंगळवारी उच्च न्यायालयाने सरकारकडे केली.द प्रोटेक्शन आॅफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल आॅफेन्स अ‍ॅक्ट, २०१२ (पॉक्सो)अंतर्गत मुलांवरील अत्याचाराचा तपास कशा पद्धतीने करायचा आणि खटलाही कसा चालवायचा, याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे अशा केसेस हाताळताना कायदा पाळण्यात येतो का? अशी विचारणा न्या. व्ही. एम. कानडे व न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठाने राज्य सरकारकडे केली. अन्य केसेसमध्ये खटला चालविण्यात येतो, त्याप्रमाणे पॉक्सोअंतर्गत खटला चालवू शकत नाही. न्यायालयाचे वातावरण मुलांना साजेसेच असले पाहिजे. तशी तरतूद कायद्यात आहे, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. पुण्यातील अपंग कल्याण केंद्रातील १२ ते १५ वयोगटातील तीन अपंग मुलींचे २०१३मध्ये लैंगिक शोषण करण्यात आले. त्याविरुद्ध या तिघींनीही केंद्राचे मुख्याध्यापक, शिपाई व अन्य एकावर नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तिघांवरही तीन वेगवेगळे एफआयआर नोंदविण्यात आले. त्यापैकी एका केसमध्ये या तिघांचा जामीन मंजूर करण्यात आला. उरलेल्या दोन केसेसमध्ये जामीन मिळाला नसतानाही त्यांची सुटका करण्यात आली. त्यामुळे संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यात यावी व राज्यभर पॉक्सोची अंमलबजावणी करण्यात येते की नाही, हे पाहण्यासाठी समिती नेमण्यात यावी, अशी मागणी करण्यासाठी अपर्णा दुबे यांनी अ‍ॅड. यशोधन देशमुख यांच्यामार्फत याचिका दाखल केली. ‘निवारा केंद्रांमध्ये सर्रासपणे हे प्रकार सुरू आहेत. अशा मुलांच्या संरक्षणासाठी काही पावले उचलली आहेत का? पोलीसही पॉक्सोप्रमाणेच अशा केसेसमध्ये तपास करतात का? हे आम्हाला जाणायचे आहे. दोन आठवड्यांत याबाबत माहिती द्या,’ असे म्हणत न्यायालयाने नारायणगाव पोलीस ठाण्याच्या पोलिसांना पुढील सुनावणीदरम्यान हजर राहण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)