"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 08:20 PM2024-05-24T20:20:09+5:302024-05-24T20:21:11+5:30

Vijay Wadettiwar News: ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला गेल इंडिया या पेट्रोकेमिकल्स कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्रातून भाजपची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशात गेला आहे. यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला सवाल करत धारेवर धरले आहे.

"What is the Shinde government doing when the industries in Maharashtra are being taken away to other states?", asked Vijay Wadettiwar. | "महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल

"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल

 मुंबई -  ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला गेल इंडिया या पेट्रोकेमिकल्स कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्रातून भाजपची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशात गेला आहे. यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला सवाल करत धारेवर धरले आहे.

 विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भात एक ट्विट केलं असून, त्यात ते म्हणाले की, आधी महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवण्यात आले, आता मध्य प्रदेशमध्ये प्रकल्प पळवण्यात आला आहे. महाराष्ट्रावर भाजपाची आगपाखड का असा सवाल यानिमित्ताने निर्माण होत आहे.  महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करत आहे ?असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील दाभोळ किंवा छत्रपती संभाजीनगर येथे प्रस्तावित असलेला गेल इंडिया कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात गेल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला होता. या प्रकल्पाच्या माध्यमातून ५० हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार होती. 

Web Title: "What is the Shinde government doing when the industries in Maharashtra are being taken away to other states?", asked Vijay Wadettiwar.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.