शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 06:39 IST

विधिमंडळात विधान परिषदेचे सभापती, उपसभापती, विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील मंत्री, राज्यमंत्री यांच्यासाठी विशेष दालने आहेत.

विधान भवनाच्या पहिल्या मजल्यावर रेल्वेचे आरक्षण केंद्र आहे. अधिवेशनासाठी येणाऱ्या आमदार, अधिकाऱ्यांना या सुविधेचा मोठा फायदा होतो. मात्र, याच आरक्षण केंद्राच्या खोलीत दोन मोठी लोखंडी कपाटे आरक्षणासाठी येणाऱ्या आमदारांचे पीए, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. या कपाटांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचे लेबल लावली आहेत. विधिमंडळात विधान परिषदेचे सभापती, उपसभापती, विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील मंत्री, राज्यमंत्री यांच्यासाठी विशेष दालने आहेत. या दालनामध्ये त्यांना लागणारे आवश्यक साहित्य ठेवण्यासाठी भली मोठी कपाटेही आहेत. मात्र, अजित पवार यांची कपाटे आरक्षण केंद्रात ठेवल्यामुळे त्यात काय दडलंय? याचीच चर्चा सुरू आहे.

‘देसी गर्ल’ची विदेशी आवड! भारतीय चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारत रसिकांमध्ये ‘देसी गर्ल’ नावाने लोकप्रिय असलेली प्रियांका चोप्रा मागील बऱ्याच वर्षांपासून हॉलीवूडपटांमध्ये बिझी आहे. त्याचा परिणाम जणू काही तिच्या आवडी-निवडींवरही झाल्याचे दिसते. नुकतीच भारतीय स्नॅक्स डावलून विदेशी स्नॅक्सची निवड केल्याने ती ट्रोल झाली आहे. एका मुलाखतीत तिने समोसा आणि चिकन तिक्का मसालासोबत विदेशी स्नॅक्सची निवड केली. तिने वडापाव डावलून हॉट डॉगला पसंती दर्शवली. त्यामुळे ती प्रचंड ट्रोल झाली. ट्रोलिंगचा व्हिडिओ शेअर करत इन्स्टाग्राम स्टोरीत प्रियांका म्हणाली की, देशी असण्याचाही कोणता अभ्यासक्रम असल्याचे माहीत नव्हते. यावरूनही नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार