शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

West Bengal Election Result 2021: “पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या एवढ्या जागा येणे, ही फार मोठी गोष्ट”

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 4:34 PM

West Bengal Election Result 2021: भाजप खासदाराने पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या एवढ्या जागा येणे, ही फार मोठी गोष्ट असल्याचे म्हटले आहे.

ठळक मुद्देभाजप खासदाराची प्रतिक्रियाभाजपच्या एवढ्या जागा येणे, ही फार मोठी गोष्ट असल्याचे मत

जळगाव: देशभरात निवडणूक निकालाची धामधूम सुरू आहे. सर्वांचे लक्ष पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक निकालाकडे (West Bengal Election Result 2021) लागले आहे. तृणमूल काँग्रेसचा विजय निश्चित झाला असून, यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. देशातील अनेक नेत्यांनी ममता बॅनर्जी यांचे केले आहे. मात्र, भाजपच्या एका खासदाराने पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या एवढ्या जागा येणे, ही फार मोठी गोष्ट असल्याचे म्हटले आहे. (west bengal election result 2021 bjp raksha khadse react on bengal election result)

पश्चिम बंगालमधील कल स्पष्ट होत असताना अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यातच आता भाजप खासदार रक्षा खडसे यांनीही आपले मत व्यक्त केले आहे. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाच्या एवढ्या जागा येणे ही फार मोठी गोष्ट आहे. कारण पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे राज्य होते. त्यांना चॅलेंज करून आम्हाला जास्त जागा मिळवता आल्या. एका प्रकारे बंगालमध्ये भाजपाचे यशच म्हणावे लागेल, असे रक्षा खडसे यांनी म्हटले आहे. 

“भाजपने बंगाल निवडणूक प्रतिष्ठेची केली, पण जनतेने सत्तेपासून दूर ठेवलं”

मोदींची लोकप्रियता घटली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि भाजपची लोकप्रियता होती, ती आता कुठेतरी घसरल्याची दिसते. पश्चिम बंगालची निवडणूक भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. पश्चिम बंगालच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहाभाजपाचे देशभरातील प्रमुख पदाधिकारी तिथे गेले होते. या ना त्या प्रकारे पश्चिम बंगालमध्ये आपली सत्ता स्थापन करावी, यासाठी भाजपा मैदानात उतरली होती. मात्र, पश्चिम बंगालच्या जनतेने पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी भाजपाला सत्तेपासून जनतेने दूर ठेवले आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले. 

कोरोनाने केलं पराभूत, मात्र मतदारांनी जिंकवलं; तृणमूलचा मयत उमेदवार आघाडीवर 

दरम्यान, भाजप आणि तृणमूलमध्ये जोरदार टक्कर होईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. दोन दिवसांपूर्वी मतदान संपल्यानंतर आलेले एक्झिट पोल्सचे आकडे हेच दाखवत होते. पण प्रत्यक्षात मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी एकहाती लढत देत भाजपचे सत्ताबदलाचे मनसुबे धुळीस मिळवले. ममता बॅनर्जींचा तृणमूल पक्ष सध्या २०० पेक्षा अधिक मतदारसंघांत आघाडीवर असल्याने सर्व एक्झिट पोल्स चुकले आहेत. एकाही एक्झिट पोल्सने ममतांच्या पक्षाला २०० पेक्षा अधिक जागा मिळतील आणि भाजप १०० च्या खाली राहील असा अंदाज वर्तवलेला नव्हता.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Assembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021BJPभाजपाAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण