शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

माऊलींचे माहेरात मनोभावे स्वागत!

By admin | Updated: August 21, 2015 23:51 IST

शेगाव येथे अडीच लाख भाविकांची मांदियाळी.

गजानन कलोरे/ शेगाव (बुलडाणा):'न करि आळस जाय पंढरीसी!अवघी सुखराशी तेथे आहे! पाहता भिवंरा करी एक स्नान! घाली लोटागंन पुंडलिका!!' संत येती घरा, तोची दिवाळी दसरा.. या उक्तीप्रमाणे शुक्रवारी शेगाव येथील नागरिकांनी तब्बल दोन महिन्यांच्या दीर्घ प्रवासानंतर माहेरी आलेल्या माऊलींचे, संतश्री गजानन महाराजांच्या पालखीचे मनोभावे स्वागत केले. आषाढी एकादशीच्या सोहळ्यानंतर २२ दिवसांमध्ये तब्बल ५६३ किलोमीटरचा प्रवास करून श्रींची पालखी शुक्रवारी संत नगरीत दाखल झाली. शेगाव येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ श्रींची पालखी येताच संत गजानन महाराज शिक्षण संस्थेचे तथा संस्थानचे विश्‍वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांनी श्रींच्या रजत मुखवट्याचे पूजन केले. त्यानंतर श्री गजानन इंग्लिश स्कूल आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, तसेच संत गजानन भक्तांच्या उपस्थितीत श्रींची आरती करण्यात आली. श्री गजानन वाटिकेजवळ संस्थानचे कार्यकारी विश्‍वस्त निळकंठदादा पाटील, अध्यक्ष डॉ. डांगरा, विश्‍वस्त नारायणराव पाटील, गोविंदराव कलोरे यांनी पालखीचे स्वागत केले. त्यानंतर संतनगरीतून श्रींच्या पालखीची शोभायात्रा काढण्यात आली. पालखीचे ठिकठिकाणी मनोभावे स्वागत करण्यात आले. संतनगरीत पालखीपूर्वी आणि पालखीसोबत दाखल झालेल्या भाविकांसाठी वाटिकेजवळ संस्थानच्यावतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. वारकर्‍यांच्या गर्दीमुळे शेगावात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.दिंडीचे एक टोक शेगावात, तर दुसरे खामगावातआषाढी एकादशीला श्री विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर ह्यश्रींह्णच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरू झाला. महिनाभराच्या प्रवासानंतर पालखी गुरूवारी खामगाव येथे पोहोचली. शुक्रवारी पहाटेच पालखीने शेगावच्या दिशेने मार्गक्रमण केले. पालखी शेगावकडे मार्गस्थ होण्यापूर्वीच खामगाव शहरातील नागरिकांसह पश्‍चिम विदर्भाच्या कानाकोपर्‍यातील भाविक दिंडी मार्गावर निघाले. पहाटे तीन वाजतापासूनच भाविकांचा ओढा या मार्गावर सुरू झाला होता. पालखी निघेपर्यंत आणि पालखी निघाल्यानंतरही हा ओढा निरंतर सुरू होता. दिवस उजाडेपर्यंत तब्बल लाखाच्यावर भाविकांची दिंडी मार्गावर गर्दी झाल्याने, गर्दीचे एक टोक संत गजानन महाराज मंदिरात तर शेवटचे टोक खामगावात अशी परिस्थिती सकाळी ९ वाजताच्या दरम्यान होती. दिंडी मार्गावरील आबाल वृद्धांच्या गर्दीमुळे या मार्गावर पोलिस प्रशासनाकडून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.