शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठल-रुक्मिणीचा थाटात विवाह सोहळा

By admin | Updated: January 25, 2015 01:41 IST

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये परंपरेने होत असलेला विठ्ठल-रुक्मिणी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात शनिवारी सकाळी पार पडला.

पंढरपूर : विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये परंपरेने होत असलेला विठ्ठल-रुक्मिणी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात शनिवारी सकाळी पार पडला. सोहळ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मातेला पांढरा पोशाख घालण्यात आला होता. तसेच विविध अंलकार परिधान केले होते.या सोहळ्याप्रसंगी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने यांच्या हस्ते सकाळी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची पूजा झाली. तर, सायंकाळी प्रदक्षिणा मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मातेची प्रतिकात्मक मूर्ती रथात ठेवण्यात आल्या होत्या. शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध पंचमी या कालावधीत मंदिरांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. (प्रतिनिधी)मंदिराची रंगरंगोटीमहाराष्ट्राचे श्रद्धास्थान विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला तब्बल दहा वर्षांनी रंगरंगोटी करण्यात येत आहे. यापूर्वी १९९६ साली विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला रंगरंगोटी करण्यात आली होती. आता मंदिराच्या नामदेव पायरी परिसर तसेच पश्चिम द्वार परिसरला रंगरंगोटीचे काम सुरू आहे. हे काम बंगळुरू येथील पांडुरंग संस्था मोफत करीत आहे. विठ्ठल मंदिरातील लाकडी सभा मंडपालाही पॉलिश करण्याच्या कामाचा ठेका सोलापूर येथील खासगी संस्थेला देण्यात येणार आहे. या कामास १ लाखांचा खर्च अपेक्षित आहे.असून यास एक महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने यांनी सांगितले. दोन महिन्यांपूर्वी मंदिराच्या कळसाला रंग देण्यात आला आहे. आता मंदिराच्या काही भागाला रंगरंगोटी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.- शिवाजी कादबाने, कार्यकारी अधिकारी, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती