तापमानाचा पारा चढणार; अनेक भागात पाऊस येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 09:07 IST2025-11-25T09:07:33+5:302025-11-25T09:07:51+5:30
Weather Update: दक्षिण भारतातील उत्तर-पूर्व मान्सूनच्या हवामानातील ओलाव्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असून, हवेने दिशा बदलामुळे किमान तापमानातही वाढ झाली आहे.

तापमानाचा पारा चढणार; अनेक भागात पाऊस येणार
मुंबई - दक्षिण भारतातील उत्तर-पूर्व मान्सूनच्या हवामानातील ओलाव्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असून, हवेने दिशा बदलामुळे किमान तापमानातही वाढ झाली आहे.
मुंबईसह राज्यभरातील किमान तापमानाचा पारा चढला असून, दि. २९ नोव्हेंबरनंतर पुन्हा उत्तरेकडून दक्षिणेकडे थंड वारे वाहण्यास सुरू झाल्यावर किमान तापमान खाली येईल, अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली. दरम्यान, सोमवारी मुंबईचे किमान तापमान २१.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, गेल्या आठवड्यातच्या तुलनेत यात सरासरी ४ अंशांनी वाढ झाली आहे.