शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प यांची अचानक उदारता कशासाठी?
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
4
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
5
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
6
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
7
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
10
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
11
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
12
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
13
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
14
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
15
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
16
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
17
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
18
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
19
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
20
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ शस्त्रे फॉरेन्सिक लॅबकडे?

By admin | Updated: December 4, 2014 02:33 IST

जवखेडे खालसा येथील एका घरात सापडलेली काही शस्त्रे तपासाचा भाग म्हणून अहमदाबाद येथील फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आल्याचे समजते

पाथर्डी (जि.अहमदनगर) : जवखेडे खालसा येथील एका घरात सापडलेली काही शस्त्रे तपासाचा भाग म्हणून अहमदाबाद येथील फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आल्याचे समजते. याबाबत पोलिसांनी मात्र काहीही बोलण्यास नकार दिला आहे.दलित कुटुंबातील हत्या प्रकरणात पोलिसांना आता महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. मंगळवारी रात्री पोलिसांना जवखेडे येथे एका घरामध्ये शस्त्रे सापडली. पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे २० आॅक्टोबरला दलित कुटुंबातील तिघांची धारदार शस्त्राने हत्या झाली. त्याचे राज्यासह देशभरात पडसाद उमटले. घटनेला सुमारे ४३ दिवसांचा कालावधी उलटला असला तरी पोलीस मात्र ठोस निष्कर्षापर्यत पोहोचलेले नाहीत. पोलिसांचा तपास अत्यंत गुप्त पद्धतीने सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून मंगळवारी रात्री पोलिसांनी जवखेडे येथील एका कुटुंबाच्या घरात जाऊन झडती घेतली. त्यात त्यांना काही शस्त्रे, कपडे आढळले. सापडलेली शस्त्रे याच गुन्ह्यात वापरली का, याचा छडा लावण्यासाठी ही शस्त्रे अहमदाबाद येथील फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आल्याचे बोलले जाते. याबाबत तपास अधिकारी सुनील पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशी काही शस्त्रे व कपडे सापडल्याच्या घटनेचा इन्कार केला. ठोस कोणताही पुरावा या प्रकरणात सापडला नसून, तसा पुरावा हाती आल्यावर माध्यमांना सांगितले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)