शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना आधार देणे आपलीच गरज!

By admin | Updated: September 8, 2015 01:24 IST

शेतकरी बांधवांनो आत्महत्या करू नका. हा मोठा गुन्हा आहे. तुम्ही एकटे नाहीत. आम्ही तुमच्या सोबत आहोत. किरकोळ रकमेचा धनादेश देताना आम्हालाही लाज वाटते.

औरंगाबाद : शेतकरी बांधवांनो आत्महत्या करू नका. हा मोठा गुन्हा आहे. तुम्ही एकटे नाहीत. आम्ही तुमच्या सोबत आहोत. किरकोळ रकमेचा धनादेश देताना आम्हालाही लाज वाटते. ही मदत नाही. ही सहानुभूतीही नाही. अनुकंपा तर नक्कीच नाही. ही आमची गरज आहे, असे सद्गतीत उद्गार प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी सोमवारी शेतकऱ्यांच्या विधवांना आर्थिक मदत करताना येथे काढले. नाना पाटेकर यांनी भावनिक साद दिल्याने अनेकांना हुंदका रोखता आला नाही. पाणावलेल्या डोळ्यांनी उपस्थितांनी बळीराजाच्या ऋणातून उतराई होण्याचा संकल्प सोडला. औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील पीडित कुटुंबीयांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचा धनादेश व कपड्यांचे वाटप नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी केले. (प्रतिनिधी)सगळं संपलं, काय करू ?हे गेले. मला सासू नाही. सासरा नाही. साडेपाच वर्षांचा मुलगा आणि चार वर्षांची मुलगी आहे. कुणाचाच आसरा नाही. घर नाही. भाड्याने राहते. काय खाऊ, कसं राहू? असे म्हणत कविता सोमनाथ राऊत यांना रडू कोसळले. नाना पाटेकर यांनी त्यांचे सांत्वन केले.आम्हा मजुरांचे काय?मदतीचे वाटप होत असतानाच एक मध्यमवयीन व्यक्ती थेट धावत मंचावर पोहोचली. हातातील कागद नाना व मकरंद यांच्या समोर टाकून, शेतकऱ्यांना मदत व आम्हा मोलमजुरी करणाऱ्यांना काहीच कसं नाही, म्हणत त्यांनी टाहो फोडला. मागील तीन वर्षांपासून माझी पत्नी आजारी आहे. काम करून सर्व कुटुंब पोसतो. पत्नीच्या आजारासाठी आता पैसा नाही. वडील मंदिरासमोर भीक मागतात. मला उपचारासाठी मदत करा, असे ती व्यक्ती जोरजोराने सांगत होती. त्यांचे वृद्ध वडीलही त्याच्यापाठोपाठ याचना करीत मंचावर दाखल झाले. तेव्हा नाना व मकरंदने त्यांना मदतीचे आश्वासन दिले. माझ्या पतीने काही खरं केलं नाही. एक आठ वर्षांचा मुलगा व चार वर्षांची मुलगी आहे मला. मुलांचे शिक्षण कसं करू? आम्ही चौघेच आहोत. त्यांच्या आंधळ्या आईला कसे सांभाळू?- सरस्वती रहाटे, अंभई, औरंगाबाद