राजेंद्र गावित सेनेच्या वाटेवर

By Admin | Updated: July 22, 2014 01:40 IST2014-07-22T01:40:43+5:302014-07-22T01:40:43+5:30

माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू राजेंद्रकुमार गावित हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. 24 जुलैला नाशिक येथील कार्यक्रमात ते सेनेत प्रवेश करणार असल्याचे सूत्रंनी स्पष्ट केले.

On the way to Rajendra Gavit Sena | राजेंद्र गावित सेनेच्या वाटेवर

राजेंद्र गावित सेनेच्या वाटेवर

नंदुरबार : माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू राजेंद्रकुमार गावित हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. 24 जुलैला नाशिक येथील कार्यक्रमात ते सेनेत प्रवेश करणार असल्याचे सूत्रंनी स्पष्ट केले. 
राजेंद्रकुमार गावित हे मंत्रलयात कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत होते. चार महिन्यांपूर्वीच त्यांनी शासकीय सेवेचा राजीनामा दिला. त्याचवेळी ते राजकारणात प्रवेश करतील, हे निश्चित होते. ते शहादा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे समजते. क्रीडा व युवक कल्याण मंत्री पद्माकर वळवी हे शहादा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. (प्रतिनिधी)

 

Web Title: On the way to Rajendra Gavit Sena