शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

लातूरमधील रुग्णालयाला मुंबईकरांकडून पाणीपुरवठा

By admin | Updated: May 14, 2016 02:50 IST

मराठवाड्यातील भीषण दुष्काळाच्या परिस्थितीत सामान्यांप्रमाणेच रुग्णालयांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. लातूरमध्येही अशीच परिस्थिती होती

मुंबई : मराठवाड्यातील भीषण दुष्काळाच्या परिस्थितीत सामान्यांप्रमाणेच रुग्णालयांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. लातूरमध्येही अशीच परिस्थिती होती. तेथील जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया पाण्याअभावी थांबल्या होत्या. अशा परिस्थितीत या रुग्णालयाला पाणीपुरवठा करण्यासाठी दादर येथील राजा शिवाजी विद्यालयाच्या १९७९ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी खारीचा वाटा उचलला आहे. त्यांच्यातर्फे रुग्णालयाला दररोज २,१०० लीटर पाणी पुरविण्यात येते. हे पाणी आरओ (रिव्हर्स आॅस्मॉसिस) प्रक्रिया करून तयार केलेले आहे. या उपक्रमाबाबत माहिती देताना राजा शिवाजीच्या १९७९ च्या बॅचचे अजय कांबळी यांनी सांगितले, की या बॅचच्या विद्यार्थ्यांचे दरवर्षीप्रमाणे गेट टूगेदर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी दुष्काळग्रस्त भागासाठी काहीतरी करावे, असा विचार पुढे आला. कांबळी यांनी त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर गाव दत्तक घेण्याची कल्पना मांडली. त्यावेळी त्यांचे सहकारी राजेश माने यांनी लातूरमधील रुग्णालयांच्या अवस्थेविषयी सांगितले. त्यातूनच या ग्रुपने रुग्णालयाला थेट पाणीपुरवठा करण्याचे ठरवले. यासाठी या माजी विद्यार्थ्यांनी वर्गणी काढून रक्कम जमा केली व थंड पाण्याचे २० लीटर पाणी भरलेले १०५ जार दररोज पुरविण्यास सुरुवात केली. १ मे रोजी सुरू करण्यात आलेली ही सेवा ३० मेपर्यंत सुरू राहणार आहे. याच पद्धतीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातही १४ मे ते ३० जून या कालावधीत कांबळी वैयक्तिक पातळीवर १५० जार पुरविणार आहेत. (प्रतिनिधी)