शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

दलित वस्त्यांच्या पाण्यासाठी ४८़३० कोटी

By admin | Updated: January 31, 2015 05:18 IST

केंद्र आणि राज्य सरकारने भरभरून निधी देऊनही राज्य सरकारच्या पाणीपुरवठा खात्याच्या नाकर्तेपणामुळे मुंबईची तहान

नारायण जाधव, ठाणेकेंद्र आणि राज्य सरकारने भरभरून निधी देऊनही राज्य सरकारच्या पाणीपुरवठा खात्याच्या नाकर्तेपणामुळे मुंबईची तहान भागविणाऱ्या ठाणे-पालघर जिल्ह्यांसह राज्यातील अनेक वाड्यावस्त्यांपर्यंत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना अद्याप पोहोचलेलीच नाही. याविषयीचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते़ यानंतर, खडबडून जागे झालेल्या पाणीपुरवठा विभागाने राज्यातील दलित वस्त्यांच्या पाणीयोजनांसाठी ४८ कोटी ३० लाख रुपयांचा निधी तत्काळ वितरीत केला आहे़यानुसार, हा निधी जीवन प्राधिकरणास ४३ कोटी ४७ लाख आणि भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेस चार कोटी ८३ लाख असा विभागून देण्यात येणार आहे़राज्यातील ३४ जिल्ह्यांतील १,००,४८८ वस्त्यांपैकी अनेक वस्त्या अद्याप पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत़ या वर्षी उद्दिष्ट दिलेल्या २,२५४ दलित वस्त्यांपैकी अवघ्या १७ वस्त्यांत ही योजना पोहोचल्याचे वास्तव ैै‘लोकमत’ने समोर आणले होते़ तसेच भटक्या विमुक्तांच्या १७,५०५ वस्त्यांपैकी २६७, अल्पसंख्याकांच्या ८३४८ पैकी १६२ आणि अल्प उत्पन्न गटातील ३७५७ पैकी ७८ वस्त्यांतच ही योजना पोहोचल्याचेही निदर्शनास आणले होते़राज्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारचा हिस्सा म्हणून १०० कोटी ३५ लाख आणि राज्य सरकारचा हिस्सा म्हणून २८ कोटी रुपये असे १२८ कोटी २८ लाख महाराष्ट्र सरकारने नववर्षातच जिल्हानिहाय वितरीत केल्यानंतर राज्यात ही योजना कितपत यशस्वी ठरली, याचा शोध घेण्याचा प्रयत्न लोकमतने केला असता दरवर्षी हा निधी देऊनही राज्यातील अल्पसंख्याकांसह दलित आणि भटक्या विमुक्तांच्या अनेक वस्त्यांत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम पोहोचलेलाच नसल्याचे वास्तव निदर्शनास आले होते़ त्यानंतर, महाराष्ट्र शासनाने हा ४८ कोटी ३० लाखांचा निधी खास दलित वस्त्यांसाठी दिला आहे़