उल्हासनगरात धोबीघाट रस्त्यावर ६ महिन्यांपासून जलवाहिनी गळती; हजारो लिटर पाणी वाया!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 17:10 IST2025-10-10T17:09:57+5:302025-10-10T17:10:26+5:30
Ulhasnagar Water Leak: उल्हासनगरात घोबीघाट रस्त्याच्या मधोमध जलवाहिन्याला गळती लागून हजारो लिटर पाणी वाया जात आहे.

उल्हासनगरात धोबीघाट रस्त्यावर ६ महिन्यांपासून जलवाहिनी गळती; हजारो लिटर पाणी वाया!
उल्हासनगर : कॅम्प नं-२, खेमानी ते घोबीघाट रस्त्याच्या मधोमध जलवाहिन्याला गळती लागून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. गेल्या सहा महिन्यापासून महापालिकेला पाणी गळती बंद करता आला नसल्याने, सर्वस्तरातून टिका होत आहे.
उल्हासनगरात भुयारी गटार योजने अंतर्गत रस्ते खोदण्यात येत असल्याने, शहराचा चेहरा विद्रुप झाल्याची टिका होत आहे. तर दुसरीकडे चांगल्या रस्त्याकडे महापालिका दुर्लक्ष करीत आहे. कॅम्प नं-२, खेमानीकडून घोबीघाट, म्हारळ गाव नाक्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या मधोमध अनेक ठिकाणी जलवाहिनीला गळती लागून हजारो लिटर पाणी खाली जात आहे. या पाणी गळतीने रस्ता धोकादायक झाला असून रस्ता दूरस्तीसाठी गेल्या आठवड्यात मनसेने धरणे आंदोलन केले.
रस्ता दुरस्तीचे आश्वासन दिल्यानंतरही रस्ता जैसे थे आहे. गेल्या सहा महिन्यापासून जलवाहिनीला गळती लागून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. शहरातील विविध भागात पाणी टंचाई असतांना दुसरीकडे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याबाबत पाणी पुरावठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुले यांच्याशी संपर्क झाला नाही.
रस्ता दुरस्ती श्रेयासाठी भाजपा व मनसे आमने-सामने
कॅम्प नं-३, फॉरवर्ड लाईन चौक ते नेहरू चौक दरम्यानच्या रस्त्याच्या दुरस्तीचे श्रेय घेण्यासाठी आमदार कुमार आयलानी, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया समर्थकासह रात्री रस्त्यावर उतरले होते. मनसे पदाधिकाऱ्यांनी भाजपाचा कित्ता गिरवीला. मात्र धोबीघाट रस्त्याच्या दुरावस्थेचा जाब महापालिका आयुक्ताना विचारात नाही.
पाणी पुरवठा विभाग नावालाच
पाणी पुरवठा विभागा अंतर्गत ४५० कोटीची भुयारी गटार योजना, १२५ कोटीची पाणी पुरवठा योजना या मोठया योजनेकडेच विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुले यांच्यासह सहकार्याचे लक्ष असल्याची टिका होत आहे. इतर कामे दुर्लक्षित झाल्याने, पाणी पुरवठा विभाग नावालाच असल्याचा आरोप राजकीय नेते करीत आहेत