शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेटवर पायरेटेड चित्रपट पाहणे गुन्हा नाही!

By admin | Updated: September 6, 2016 04:37 IST

पायरेटेड प्रत आॅनलाईन पाहिल्यामुळे कॉपीराईट कायद्याचा भंग होत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

मुंबई : कॉपीराईट असलेल्या चित्रपटाचे विनापरवाना वितरण करणे, सार्वजनिकरीत्या तो दाखवणे आणि विनापरवानगी विकणे किंवा भाड्याने देणे, हा दंडनीय गुन्हा असून केवळ अशा चित्रपटाची पायरेटेड प्रत आॅनलाईन पाहिल्यामुळे कॉपीराईट कायद्याचा भंग होत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.मुंबई उच्च न्यायालयाने इंटरनेट पुरवठादार कंपन्यांना काही यूआरएल ब्लॉक करण्यास सांगितले होते. यासंबंधी ‘ढिशुम’ या हिंदी चित्रपटाच्या निर्मात्याने उच्च न्यायालयात पायरसीविरोधात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीत इंटरनेट सेवा पुरवठादारांना (आयएसपी) पायरसी करणारी अनेक संकेतस्थळे ब्लॉक करण्याचे आदेश नुकतेच देण्यात आले होते. तसेच ब्लॉकिंगचा फटका प्रामाणिकपणे ई-कॉमर्स करणाऱ्या संकेतस्थळांना बसू नये, यासाठी संकेतस्थळांवर ‘एरर संदेश’ दाखविण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होते. त्यानुसार, इंटरनेट सेवा पुरवठादारांनी आपल्या संकेतस्थळावर ‘संबंधित संकेतस्थळावरील मजकूर पाहाणे, डाऊनलोड करणे, प्रदर्शित करणे किंवा त्याची नक्कल करणे हा दंडनीय अपराध आहे’, असा संदेश दिला होता. मात्र, हा संदेश हटवण्यास उच्च न्यायालयाने सांगितले आहे. त्याऐवजी अधिक नेमकेपणा असलेला संदेश दाखविण्यात यावा, असे न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी म्हटले आहे. ‘न्यायालयाच्या आदेशांनुसार हे संकेतस्थळ ब्लॉक करण्यात आले आहे आणि त्याबाबत कुणाला काही तक्रार असल्यास आयएसपीच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करावा’ असा नवा संदेश देता येईल, असेही न्यायालयाने सुचविले आहे. मात्र, आपली बाजू मांडताना टाटा कम्युनिकेशनच्या ओमप्रकाश धर्मानी यांनी न्यायालयाला सांगितले की, टाटा कम्युनिकेशन आणि अन्य आयएसपीकडून वापरण्यात येणाऱ्या फायरवॉलमध्ये ३२ केबीपेक्षा मोठ्या फाईल न उघडण्याची व्यवस्था केलेली आहे. मात्र ही अत्यंत कमी क्षमता आहे, असे सांगत न्या. पटेल यांनी त्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)