अजित पवारांच्या विमानाचा अपघात की घातपात?, CID चा पहिल्यांदाच खुलासा; तपासात काय आढळले पुरावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 09:36 IST2026-02-27T09:35:26+5:302026-02-27T09:36:26+5:30

विमानाच्या ब्लॅक बॉक्ससह अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत असं CID अधिकाऱ्यांनी सांगितले.

Was Ajit Pawar plane an accident or murder?, CID reveals for the first time; What evidence was found in the investigation? | अजित पवारांच्या विमानाचा अपघात की घातपात?, CID चा पहिल्यांदाच खुलासा; तपासात काय आढळले पुरावे?

अजित पवारांच्या विमानाचा अपघात की घातपात?, CID चा पहिल्यांदाच खुलासा; तपासात काय आढळले पुरावे?

मुंबई -  राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच सीआयडीने मौन सोडले आहे. सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक यांनी पत्रकार परिषद घेत या अपघातावर भाष्य केले आहे. अजित पवारांचा विमान अपघात होता की, घातपात होता या प्रत्येक पैलूने सीआयडी तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले. जर या तपासात हत्या, निष्काळजीपणा अथवा इतर कुठलेही गुन्हेगारी कृत्य समोर आले तर CID कायदेशीर रित्या यावर गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.

अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या अपघाताची चौकशी करण्यासाठी अनेक तपास यंत्रणांचा समावेश आहे. विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) च्या रिपोर्टची आम्ही प्रतिक्षा करत आहोत. AAIB चा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सीआयडीच्या तपासात अंतिम निष्कर्ष काढता येईल आणि आवश्यक असल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल. अनेक एजन्सींच्या सहभागामुळे डेटा संकलन आणि तांत्रिक विश्लेषणात वेळ लागत आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यांवरून कोणताही तात्काळ निष्कर्ष काढता येत नाही. सविस्तर तपासानंतरच स्पष्ट चित्र समोर येईल. हा तपास निष्पक्षपणे आणि सखोलपणे केला जात आहे. जर कोणी दोषी आढळले तर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा विश्वासही सीआयडी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, तपास वेगाने सुरू आहे. तूर्तास कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. विमानाच्या ब्लॅक बॉक्ससह अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत. या सर्व तांत्रिक बाबींचे सखोल विश्लेषण केले जात आहे. तपास कोणाच्याही दबावाखाली सुरू नाही तर वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे सुरू आहे असं सांगत सीआयडी अधिकाऱ्यांनी रोहित पवारांचे दावे फेटाळले. तपास भरकटला जातोय असा आरोप रोहित पवारांनी केला होता. 

काय म्हणाले होते रोहित पवार?

अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणाशी संबंधित सर्व माहिती आणि पुरावे आम्ही CID कडे सुपूर्द केले. अपघाताला जबाबदार VSR कंपनी तसेच DGCA विरोधात FIR दाखल करणे का गरजेचे आहे याबाबत चर्चा करून पारदर्शक आणि सखोल चौकशी करण्याची विंनती केली. आभाळाएवढी उंची असलेल्या नेत्याच्या अपघाताची साधी FIR सुद्धा घेतली जात नाही याची खंत वाटते. असो काहीही झाले तरी दोषींना मात्र सोडणार नाही पूर्ण ताकदीनिशी हा लढा लढू असं रोहित पवारांनी म्हटलं. 

Web Title : अजित पवार का विमान हादसा: दुर्घटना या साजिश? CID ने खोले जांच के राज।

Web Summary : सीआईडी अजित पवार के विमान हादसे की जांच कर रही है, दुर्घटना या साजिश की आशंका है। निर्णायक निष्कर्ष के लिए AAIB रिपोर्ट का इंतजार है। रोहित पवार ने जांच में पक्षपात का आरोप लगाया; सीआईडी ने दबाव से इनकार किया, पूरी तरह से सबूत-आधारित दृष्टिकोण पर जोर दिया।

Web Title : Ajit Pawar's plane crash: Accident or sabotage? CID reveals investigation details.

Web Summary : CID investigates Ajit Pawar's plane crash, probing accident or foul play. Awaiting AAIB report for conclusive findings. Rohit Pawar alleges investigation bias; CID denies pressure, emphasizing thorough, evidence-based approach.