ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 00:00 IST2025-10-10T00:00:03+5:302025-10-10T00:00:37+5:30
एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांची आज अहिल्यानगर येथे झालेली सभा वारिस पठाण आणि इम्तियाज जलील यांनी गाजवली. यावेळी वारिस ...

ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’
एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांची आज अहिल्यानगर येथे झालेली सभा वारिस पठाण आणि इम्तियाज जलील यांनी गाजवली. यावेळी वारिस पठाण यांनी गेल्या काही काळापासून कट्टर हिंदुत्त्ववादी भूमिका घेतलेले आणि प्रक्षोभक विधाने करणारे भाजपा आमदार आणि राज्य सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी आव्हान दिले. तू दोन पायांवर येईल, पण जातान स्ट्रेचरवरून जावं लागेल, असं आव्हान वारिस पठाण यांनी नितेश राणे यांना दिले.
एमआयएम नेते आणि माजी आमदार वारिस पठाण यांनी आपल्या भाषणामधून नितेश राणे यांना लक्ष्य केले ते म्हणाले की, एक नेपाळी म्हणतो की मुस्लिमांना मशिदीत घुसून मारू. मात्र तू दोन पायांवर येशील तर जाताना स्ट्रेचरवरून जाशील, असा इशारा पठाण यांनी नितेश राणे यांना दिला.
तर माजी खासदार इम्तियाज जलील यांनीही आक्रमक भाषण करत प्रक्षोभक भाषा बोलणाऱ्या भाजपा आणि महायुतीच्या नेत्यांना इशारा दिला आहे. सध्या मुस्लिमांना शिविगाळ देण्याची फॅशन आली आहे. सध्या राज्यात कसले कसले लोक तयार झाले आहेत. आधी आपली वेगळी इमेज तयार करण्यासाठी एक छोटासा चिंटू बोलायचा. आता या शहरात एक चिकनी चमेली आली आहे. चिकनी चमेली, तू काय चिज आहेस, असा टोलाही जलील यांनी लगावला.