शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठला, जरा कर अंतर कमी!

By admin | Updated: June 25, 2014 01:12 IST

रथावर बसलेल्या लोकांचा सहन न होणारा भार.. अन् गर्दीमुळे श्वास घेताना होणारा त्रस त्यामुळे मंगळवारी संत तुकाराम महाराज पालखी सोहळय़ातील रथाच्या बैलांचे हाल झाले. ‘

अभिजित कोळपे
- यवत (जि़ पुणो)
डांबरी रस्त्यावरून चालताना सतत पाय सटकणो.. रथावर बसलेल्या लोकांचा सहन न होणारा भार.. अन् गर्दीमुळे श्वास घेताना होणारा त्रस त्यामुळे मंगळवारी संत तुकाराम महाराज पालखी सोहळय़ातील रथाच्या बैलांचे हाल झाले. ‘विठ्ठला भार अन् अंतर कर रे कमी’ अशीच आर्त हाक बळीराजाने दिली असेल.  त्यामुळे रथावर बसणा:यांची संख्या तरी कमी करा किंवा अंतर कमी करून मुक्कामाचे दोन दिवस वाढवा, अशी विनंती बैल जोडी मालकांनी सोहळा प्रमुखांकडे केली आहे. 
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मंगळवारी सकाळी लोणी काळभोर वरून मार्गस्थ झाला. रात्रीचा मुकाम यवतला आहे. त्यामुळे लोणी ते यवतचा सुमारे 27 किलोमीटरचे अंतर बैलांसाठी मोठे होते. पालखी सोहळय़ातील इतर टप्पे लहान आहेत. हा आणि वरवंड ते उंडवडी (28 किलोमीटर) टप्पा सर्वात मोठा आहे. त्यामुळे या ठिकाणी बैलांचे हाल होणार आहेत. दरम्यान, लोणी काळभोरच्या ग्रामस्थांचा पाहुणचार घेऊन पालखी पहिल्या विश्रंतीसाठी कुंजीरवाडी, तर दुपारच्या मुक्कामासाठी सव्वाएकच्या दरम्यान उरूळी कांचन येथे आली. या वेळी रस्त्याच्या दुतर्फा पालखी रथावर ग्रामस्थांनी भक्तिभावाने फुलांचा वर्षाव करून स्वागत केले.
 
डोळे आकाशाकडे
वारीच्या वाटेवर अंतर कापताना लक्ष खाली.. अन् डोळे आकाशाकडे असे भाव अनेक वारक:यांच्या चेह:यावर दिसत होते. अहमदनगर जिलतील कर्जत तालुक्यातून आलेल्या एका वारक:याने सांगितले, की पाऊस झाला नसल्याने अनेक जण वारीत दाखल झाले नाहीत. अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून पेरण्या पूर्ण झाल्यावर ही संख्या निश्चितच वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
उद्याचा मुक्काम वरवंडला
बुधवारी सकाळी सातच्या दरम्यान पालखी यवतहून मार्गस्थ होणार असून, भांडगाव, केडगाव-चौफुला येथे विसावा घेऊन रात्रीच्या मुक्कामासाठी वरवंडला येणार आहे.
 
शासकीय यंत्रणा हायटेक
च्आराध्य दैवत असणा:या कानडय़ा विठुरायाची आषाढी यात्र अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पंढरपूर तालुक्यात पालख्यांनी प्रवेश केल्यानंतर कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली आहे. तर यावर्षी प्रथमच पंचायत समितीची यंत्रणा हायटेक करण्यात आली असून, वॉकीटॉकीच्या माध्यमातून भाविकांना सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहेत.