शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

शिवस्मारकच्या बांधकामातील अनियमिततेची चौकशी करा; विनायक मेटेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 10:32 AM

संबंधित अधिकाऱ्यांविरोधात हक्कभंग आणण्याचा इशारा

मुंबई: शिवस्मारकाच्या बांधकामातील अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून कंत्राटदार आणि सल्लागारांनी स्मारकाच्या रचनेत मनमानीपणे बदल केले असा गंभीर आरोप मेटे यांनी पत्रातून केला आहे. या प्रकरणाची चौकशी न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात हक्कभंग आणण्याचा इशारादेखील त्यांनी दिला आहे. शिवस्मारकाच्या रचनेत अनेक बदल करण्यात आले. सल्लागार आणि कंत्राटदारांनी संगनमत करुन रचनेत मनमानीपणे बदल केल्याचा आरोप मेटे यांनी पत्रातून केला आहे. मुख्यमंत्र्यांना आणि शिवस्मारक कृती समितीला अंधारात ठेवून हे बदल केल्याचा आरोपदेखील मेटे यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी पत्रातून केली आहे. या प्रकरणाची चौकशी न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात हक्कभंग आणू, असा इशारा त्यांनी दिला आहे. शिवस्मारकाची उंची 210 मीटरवरुन 212 मीटर करण्यात आली. यामुळे स्मारकाचा खर्च 81 कोटींनी वाढत असल्याचं दाखवण्यात आलं. हे 81 कोटी रुपये कोणाच्या परवानगीनं वाढवण्यात आले?, असा प्रश्न मेटे यांनी पत्रातून विचारला आहे. कंत्राटदार आणि सल्लागार कंपनीच्या मनमानी बदलांमुळे भविष्यात आर्थिक आणि कायदेशीर अडचणी निर्माण होतील, असं मेटे यांनी पत्रात नमूद केलं आहे. मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून सुरू असलेल्या या सर्व बदलांची चौकशी केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.  

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजVinayak Meteविनायक मेटेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस