शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

Vinayak Mete Bodyguard Accident: विनायक मेटेंच्या गंभीर जखमी अंगरक्षकाला पुण्यात हलविले; कारण काय? शिंदेंनीही केली विचारपूस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 2:33 PM

Vinayak Mete Bodyguard Accident: अपघात झाल्यानंतर सुमारे तासभर कोणतीच मदत मिळाली नसल्याचा आरोप चालकाने केला आहे. अपघातानंतर मी विनायक मेटेंशी बोललो, त्यांनी आपण ठीक असल्याचे सांगितले होते, असेही हा चालक सांगत होता. तेव्हा ढोबळे देखील शुद्धीत होते.

शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या कारला शनिवारी पहाटे भीषण अपघात झाला. यामध्ये मेटे यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या पुढील सीटवर बसलेला अंगरक्षक जबर जखमी झाला आहे. चालक पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी केली जात आहे. 

Vinayak Mete Accident: दोन्ही एअरबॅग उघडल्या, पण त्या विनायक मेटेंसाठी नव्हत्या; अपघातावेळी काय घडले असेल?

Vinayak Mete Accident: विनायक मेटे अपघात: उदयनराजेंनी वर्मावर बोट ठेवले; सांगितली एक्स्प्रेस वेवरील मोठी चूक

अपघात झाल्यानंतर सुमारे तासभर कोणतीच मदत मिळाली नसल्याचा आरोप चालकाने केला आहे. अपघातानंतर मी विनायक मेटेंशी बोललो, त्यांनी आपण ठीक असल्याचे सांगितले होते, असेही हा चालक सांगत होता. परंतू, सव्वातासाने हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर पनवेल एमजीएमच्या डॉक्टरांनी मेटेंना मृत घोषित केले होते. या साऱ्या प्रकारावरून वाद सुरु असताना विनायक मेटेंचे बॉडीगार्ड पोलीस राम ढोबळे यांना पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. 

ढोबळे यांच्या कुटुंबीयांनीच तशी मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ढोबळे कुटुंबीयांशी फोनवरून प्रकृतीची विचारपूस केली होती. यावेळी त्यांनी राम ढोबळे यांना पुण्याला हलविण्याची मागणी केली होती. ही विनंत शिंदे यांनी मान्य करून पुढची व्यवस्था केली. ढोबळे कुटुंबीयांना पनेवपेक्षा पुणे हे सोईचे वाटत होते, यामुळे ढोबळेंना पुण्याला हलविण्यात आल्याची शक्यता आहे. ढोबळे यांच्या पायाला. पोटाला आणि डोक्याला गंभीर मार लागला आहे. टीव्ही ९ ने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

रात्री ११ च्या सुमारास ढोबळे यांना कार्डिओ अॅम्बुलन्समधून पुण्याला आणण्यात आले. त्यापूर्वी ढोबळे यांना एवढ्या लांब नेता येईल का, हे पाहण्यासाठी वेगळी डॉक्टरांची टीम एमजीएम हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आली होती. या टीमच्या मार्गदर्शनाखाली ढोबळे यांना पुण्याचील रुबी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. ढोबळे यांच्या उपचाराचा सर्व खर्च करणार असल्याचे आश्वासन शिंदे यांनी दिला आहे. ढोबळे हे देखील बीडचेच होते. गेल्या सहा-सात महिन्यांपासून त्यांची ड्युटी विनायक मेटेंचा बॉडीगार्ड म्हणून लावण्यात आली होती. मेटे मुंबईला जात असताना ढोबळे देखील मेटेंसोबत कारमध्ये होते. ते पुढील सीटवर बसले होते, त्याच बाजुला मेटेंची कार ट्रकला धडकली होती.

टॅग्स :Vinayak Meteविनायक मेटेEknath Shindeएकनाथ शिंदेPoliceपोलिस