शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

गावे महाराष्ट्राची, पीक सर्वेक्षण तेलंगणचे

By admin | Updated: October 3, 2015 03:51 IST

सीमावर्ती भागात असलेल्या महाराष्ट्रातील १४ गावांवर तेलंगणने अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे.

शंकर चव्हाण ल्ल जीवती (चंद्रपूर)सीमावर्ती भागात असलेल्या महाराष्ट्रातील १४ गावांवर तेलंगणने अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पहाडावरील या वादग्रस्त गावांसह परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र महाराष्ट्र शासनाने साधे पीक सर्वेक्षण करण्याचेही सौजन्य दाखविले नाही. याचाच फायदा घेत तेलंगण सरकारने येथील कापूस, ज्वारी, सोयाबीन आदी पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले आहे.या गावांत मराठी भाषिक राहतात. सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा १७ जुलै १९९७ रोजी ही १४ गावे महाराष्ट्र राज्याचीच असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.दऱ्याखोऱ्या असलेल्या १४ गावांतील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून शेती करणाऱ्या जमिनीचा मालकी हक्क द्यावा, अशी निवेदने दिली. गावात मंत्री आले, पण आश्वासनाशिवाय त्यांना काहीच मिळाले नाही. शासनाने वनहक्क दाव्याअंतर्गत जमिनीचे पट्टे देण्याची योजना राबविली. मात्र जाचक अट लावल्याने पहाडावर अतिक्रमण केलेल्या या शेतकऱ्यांना याचा लाभ घेता आला नाही. मात्र या शेतकऱ्यांना तेलंगण सरकारकडून मालकी हक्क मिळाले आहे, हे विशेष.सीमावादात असलेली परमडोली, तांडा, कोठा, येसापूर, मुकादमगुडा, महाराजगुडा, लेंडीजाळा, शंकरलोधी, अंतापूर, इंदिरानगर, पद्मावती, पळसगुडा, भोलापठार, लेंडीगुडा ही १४ गावे फाजल अली समितीने निर्धारित केलेल्या आंतरराज्य सीमारेषेनुसार महाराष्ट्र राज्याचीच आहेत.मागील महिन्यात दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे वादग्रस्त १४ गावांसह पहाडावरील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. याबाबत सर्वांना सूचना केल्या होत्या. पण पीक सर्वेक्षण झाले नाही. त्यामुळे पुन्हा ५ आॅक्टोबर रोजी कृषी सहायक, पटवारी व ग्रामसेवकांची संयुक्त बैठक ठेवण्यात आली आहे. - के. वाय. कुणारपवार, तहसीलदार, जीवती