शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - राजूर घाट परिसरात पर्यटकांची मांदियाळी

By admin | Updated: August 23, 2016 17:41 IST

शहराला लागून असलेल्या बुलडाणा-मलकापूर रस्त्यावरील राजूर घाट निसर्ग सौंदर्याने बहरलेला असून परिसरातील असलेल्या विविध मंदिरे, नदी, नाल्यामुळे निसर्गाच्या सौंदर्यात भर पडली आहे.

हर्षनंदन वाघ

बुलडाणा, दि. २३ : शहराला लागून असलेल्या बुलडाणा-मलकापूर रस्त्यावरील राजूर घाट निसर्ग सौंदर्याने बहरलेला असून परिसरातील असलेल्या विविध मंदिरे, नदी, नाल्यामुळे निसर्गाच्या सौंदर्यात भर पडली आहे. त्यामुळे खास सुटी काढूनपरिसरातील पर्यटनप्रेमी निसर्गाचा आनंद लुटताना दिसून येत आहेत.

अजिंठ्याच्या डोंगरात वसलेल्या बुलडाणा शहर परिसराला अलैकिक सौंदर्याची देण असल्यामुळे इंग्रजांनी आपल्या कार्यकाळात येथूनच जिल्ह्याचा कारभार सुरू केला होता. दरम्यान स्वातंत्र्यानंतर बुलडाणा शहराला जिल्ह्याचा दर्जा मिळाला. आजरोजी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी शहर परिसरात असलेले नैसर्गिक सौंदर्य दरवर्षी परिसरातील पर्यटक प्रेमींनाखुणवत असते.

बुलडाणा शहरातून मलकापूरकडे जात असताना सर्वप्रथम व्यंकटगिरी बालाजीचे मंदिर आहे. तिरूमला येथील बालाजीची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आली असून परिसरात डोंगर आहेत. राजूर घाटात एका वळणावर संकटमोचन हनुमान मंदिर आहे. या ठिकाणाहून बुलडाणा शहर परिसर तसेच राजूर घाटातील डोंगराचे सौंदर्य निहाळता येते. त्यानंतर मोताळा तालुक्यातील राजूर गावाकडे जाताना घाटातच दुर्गामात मंदिर आहे.

या परिसरात खोल दरीतील पाणी साठवलेला नाला, सर्वत्र डोंगराने पांघरलेला हिरवा शालू तसेच मोताळा शहरासमोर असलेल्या नळगंगा धरणाचे पाण्याचे विशाल पात्र निसर्ग सौंदर्यात अधिकच भर घातले. या ठिकाणाहून सुर्येदय तसेच सुर्यास्तचे दर्शन घेताना वेगळी अनुभुती मिळते. त्यानंतर मोहेगाव समोर असलेल्या तालुका पर्यटन केंद्र तसेच त्यापुढे असलेल्या जमिनीखाली १५ फुट खोल असलेल्या महादेवाचे मंदिर आहे. या परिसरात नळगंगा नदीचे वाहणारे पाणी, परिसरातील हिवराई मनाला सुखावून जाते. दरवर्षी श्रावण महिन्यात बुलडाणा शहर परिसरातील अजिंठ्याच्या डोंगरातील निसर्गसौंदर्य पर्यटकांना हाक देत असते. या ठिकाणी इतर जिल्ह्यातील येणारे पर्यटकांनी भेट दिल्यास परत परत येथील निसर्ग सौंदर्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही.या ठिकाणी होत आहे पर्यटकांची गर्दीबुलडाणा शहरालगत असलेल्या वनविभागाचा सनसेट पॉर्इंट व्यंकटगिरी, राजूर घाटातील, संकटमोचन हनुमान, बुलडाणा अर्बन सनसेट पॉर्इंट, दुर्गामाता मंदिर, राजूर येथील महादेव मंदिर, खामखेड जवळ अणारे नळकुंड येथे पर्यटक भेट देवून निसर्गाचा आनंद घेत आहेत.