Video: गालात चापट, पाय पकडून ओढले; सुनेची वृद्ध सासूला जबर मारहाण, FIR दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 14:13 IST2023-10-10T14:11:40+5:302023-10-10T14:13:09+5:30

ठाणे जिल्ह्यात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video: Slap on the cheek, grab the leg and drag; Daughter-in-law assaults elderly mother-in-law, FIR filed | Video: गालात चापट, पाय पकडून ओढले; सुनेची वृद्ध सासूला जबर मारहाण, FIR दाखल

Video: गालात चापट, पाय पकडून ओढले; सुनेची वृद्ध सासूला जबर मारहाण, FIR दाखल

ठाणे- ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुनेनं आपल्या वृद्ध सासू जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी सुनेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महिला सोफ्यावर बसलेल्या सासूला खाली पाडून मारहाण करताना दिसत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सासू सोफ्यावर बसली होती, यावेशी सुनेनं तिला खोलीत जाण्यास सांगितले. पण, सासूने खोलीत जाण्यास नकार दिल्यामुळे सूनेनं तिच्यावर जबरदस्ती केली. वृद्ध महिलेने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सुनेने तिला चापट मारली. यानंतर महिलेने सासूचे पाय पकडून तिला जमिनीवर पाडून मारहाण केली.

यानंतर महिलेने वृद्ध सासूला ओढून घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. व्हायरल व्हिडिओमध्ये एक दुसरी महिला किचनमधून हा सगळा प्रकार पाहत बसली. तिने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नाही. व्हिडिओ पाहून ही महिला घरात काम करणारी मोलकरीण असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कोपरी पोलिस ठाण्यात महिलेविरुद्ध कलम 336, 337, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Video: Slap on the cheek, grab the leg and drag; Daughter-in-law assaults elderly mother-in-law, FIR filed