शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कांदा फेको आंदोलन

By admin | Updated: August 24, 2016 13:19 IST

कळवण येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीवर बुधवारी सकाळी कांदा फेको आंदोलन करण्यात आले.

ऑनलाइन लोकमत

कळवण (नाशिक), दि. २४ -  शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने कळवण तालुक्यातील  कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करून कांद्याला हमीभाव जाहीर करावा या मागणीसाठी कळवण येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीवर आज बुधवारी दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी 11 .30 वाजता  कांदा फेको आंदोलन करण्यात आले.

केंद्रातील भाजप सरकारने सर्वसामान्य जनतेला व शेतकऱ्यांना भूलथापा देऊन सत्ता काबीज केली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नसल्याने कवडीमोल भावाने कांदा विकला जात असून भाजपचे सरकार शेतकरी विरोधी असल्याने भाजपच्या  खासदार, आमदार यांना तालुक्यात फिरु न देण्याचा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे,  राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रवीण रौंदळ यांनी दिला. 
कांद्याचे भाव वाढल्यावर भाव खाली येऊन स्थिर रहावे यासाठी सरकारतर्फे हस्तक्षेप केला जातो. त्याच प्रमाणे आज रोजी कांद्याचे भाव अत्यंत कमी झाले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने शेतकरी प्रचंड हतबल झाला असून आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. दि. 1 जानेवारी 2016 पासून नाशिक जिल्ह्यातील सुमारे 63 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिरे यांनी यावेळी केली.  यापूर्वी देखील या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  तालुक्यात रास्ता रोको व अन्य आंदोलने करण्यात आली. परंतु सरकारला जाग येत नसून शेतकऱ्यांची कीव सुद्धा येत नसल्याने सरकार कांद्याबाबत काहीही निर्णय घेत नाही असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे.