शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- आमदार अवसरे यांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या हाणली थोबाडीत

By admin | Updated: August 17, 2016 21:16 IST

भाजप कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी संतापलेले भंडाऱ्याचे आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी पोलीस ठाण्यातच पोलीस कर्मचाऱ्याच्या थोबाडीत हाणली.

ऑनलाइन लोकमत

तुमसर (भंडारा), दि. 17 - भाजपतर्फे आयोजित तिरंगा रॅलीचा समारोपीय कार्यक्रमादरम्यान एका भाजप कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी संतापलेले भंडाऱ्याचे आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी पोलीस ठाण्यातच पोलीस कर्मचाऱ्याच्या थोबाडीत हाणली. ही घटना बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणाने तुमसर पोलीस ठाण्यात गदारोळ माजला असून तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.भारतीय स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त भाजपतर्फे ठिकठिकाणी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. लाखांदूर येथून सुरुवात झालेल्या या रॅलीचा समारोप तुमसर येथे सायंकाळी झाला. दरम्यान रात्री ८ वाजताच्या सुमारास रॅलीच्या समारोप प्रसंगी भाजपचा एक कार्यकर्ता रस्त्याच्या बाजूला चारचाकी वाहन उभे करून कार्यक्रमाची व्हिडीओ क्लिपिंग करीत होता. ही बाब पोलीस कर्मचारी राजू साठवणे यांना खटकली. साठवणे यांनी सदर कार्यकर्त्याला हटकले व पोलीस ठाण्यात नेऊन त्याच्या कानशिलात हाणली. तसेच तंबी देऊन वाहन अन्यत्र हलविण्याचे सांगितले.पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार भाजप कार्यकर्त्यांनी आमदार अ‍ॅड.अवसरे यांना सांगितला. माहिती होताच संतापाच्या भरात आमदार अवसरे हे तुमसर पोलीस ठाण्यात शिरले. तसेच पोलीस कर्मचारी याला बोलावून काहीच न बोलता त्याला मारहाण करायला सुरुवात केली. याची माहिती शहरात होताच भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात गोळा झाले. वृत्त लिहिपर्यंत पोलीस कर्मचारी साठवणे यांच्या तक्रारीवरून आमदार अ‍ॅड. अवसरे यांच्याविरुद्ध भादंविच्या ३५३ कलमान्वये गुन्हा दाखल केला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र शेट्टे यांनी दिली.