शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - तब्बल ४१ वर्षांपासून बाप्पांचे सारथ्य करतायत इब्राहिम

By admin | Updated: September 5, 2016 20:55 IST

हिंदू बांधवांना बाप्पा मोरयाच्या उत्सवाची जितकी ओढ असते, तितकीच आतुरता इतर धर्मियानांही या उत्सवाची असते.

अनिल गवई, ऑनलाइन लोकमत 
खामगाव, दि. ५ -  हिंदू बांधवांना बाप्पा मोरयाच्या उत्सवाची जितकी ओढ असते, तितकीच आतुरता इतर धर्मियानांही या उत्सवाची असते. त्यामुळेच या उत्सवाला सर्वधर्म समभावाचा उत्सव म्हणूनही संबोधल्या जाते. सर्व धर्मियांचा या उत्सवाला हातभार लागत असतो, मात्र, तब्बल ४१ वर्षांपासून खामगाव येथील शे. इब्राहिम बाप्पांचे सारथ्य करण्याचे भाग्य लाभत आहे.
 
खामगाव शहरातील बर्डे प्लॉट भागातील ६६ वर्षीय शे. इब्राहिम गेल्या ४४ वर्षांपासून हातरिक्षा चालविण्याचा व्यवसाय करतात. या व्यवसायावर त्यांच्या परिवाराचा उदर निर्वाह चालतो. हिंदूच्या विविध सणासुदीच्या मंडप तसेच इतर साहित्य त्यांच्या मालवाहू रिक्षातून वाहून नेल्या जाते. 

त्याचवेळी गणेशोत्सवाच्या काळात  शे. इब्राहिम विविध गणेश मंडळाच्या बाप्पांचे सारथ्य करतात. गेल्या ३६ वर्षांपासून नित्य नियमाने गणेशोत्सव काळात ते बाप्पा मोरयाच्या मूर्ती घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी पोहोचवितात. महाभारतात अर्जुनाचे सारथ्य  भगवान श्रीकृष्णाने केले होते. त्याप्रमाणेच आपण बाप्पांचे सारथ्य करण्याचे भाग्य आपणाला लाभत असल्याचे शे. इब्राहिम यांचे म्हणणे आहे. शे. इब्राहिम यांच्याप्रमाणेच अनेक इतर धर्मिय बांधवांना गणेशोत्सव काळात रोजगार मिळत असल्याने, या उत्सवांची अनेकांना आतुरता लागून असते.