शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- टीचभर पोटासाठी चिमुकल्यांच्या जीवघेण्या कसरती

By admin | Updated: January 1, 2017 19:53 IST

ऑनलाइन लोकमत/शिखरचंद बागरेचा वाशिम, दि. 1 -  टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी अंगावर शहारे आणणाऱ्या जीवघेण्या कसरती आपल्या चिमुकल्यांकडून ...

ऑनलाइन लोकमत/शिखरचंद बागरेचावाशिम, दि. 1 -  टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी अंगावर शहारे आणणाऱ्या जीवघेण्या कसरती आपल्या चिमुकल्यांकडून एका मातेला करून घ्याव्या लागत असल्याचे विदारक सत्य वाशिम शहरात रविवारी पाहायला मिळाले. समाजातील आजही एक वर्ग अत्यंत उपेक्षित आणि दारिद्र्यरेषेखालचे जीवन जगत आहे. शिक्षणाअभावी या वर्गातील लोकांना पोट भरण्यासाठी स्वत:सह मुलांकडून जिवावर बेतणारे काम करून घ्यावे लागते. याचा प्रत्यय वाशिम शहरात रविवारी आला. एकीकडे भ्रष्टाचार करून आरामाचे जीवन जगणारी मंडळी उजळ माथ्याने फिरतात, तर दुसरीकडे टीचभर पोट भरून स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी उपेक्षित घटकातील अशिक्षित वर्ग जिवावर बेतणारे प्रयोगही करायला घाबरत नाहीत. वाशिम शहरात एक महिला आपल्या चार अपत्यांसह कोल्हाट्याचा खेळ करून मिळणाऱ्या भिक्षेत आपली मुले जगविण्यासाठी फिरताना दिसली. आपल्या अवघ्या अडीच वर्षे वयाच्या बाळाचे शरीर अगदी अंगावर शहारे येण्याइतपत वेड्यावाकड्या पद्धतीने वाकविणे, सहा आणि आठ वर्षे वयाच्या इतर दोन मुलींसह अडीच वर्षाच्या बाळालाही दोन फूट परिघाच्या लोखंडी रिंगमधून एकाच वेळी घुसविणे आणि बाहेर काढण्यासारखे थरारक प्रयोग ही महिला सादर करते. विशेष म्हणजे तिच्या अडीच वर्षे वयाच्या बाळाच्या हे अंगवळणीही पडले असून, आईने सांगताच ते बालक थोरल्या बहिणींसह थरारक कसरती अगदी आनंदाने करते. मूळची अकोला जिल्ह्यात राहणारी ही महिला दोन दिवसांपासून वाशिम शहरात फिरत चिमुकल्यांच्या कसरती सादर करून त्यांच्यासह आपले पोट भरत आहे. 

https://www.dailymotion.com/video/x844mz3