शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

शहांच्या संघात विदर्भाची पाटी कोरी

By admin | Updated: August 17, 2014 00:44 IST

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणीत संघ भूमी नागपूरसह विदर्भातील पक्षाच्या नेत्यांना संधी मिळू शकली नाही.

नागपूर: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणीत संघ भूमी नागपूरसह विदर्भातील पक्षाच्या नेत्यांना संधी मिळू शकली नाही.अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी नागपूरला भेट देऊन सरसंघचालकांशी प्रदीर्घ चर्चा केली होती. त्यामुळे त्यांच्या संघात नागपूरसह विदर्भातील नेत्यांना स्थान मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. पक्षाकडे संघटनात्मक पातळीवर काम करणाऱ्या ज्येष्ठ आणि तरुण नेत्यांची फळीही असल्याने यापैकी काहींना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संघी शहा देतील अशीही चर्चा होती. यातूनच विदर्भातील काही नेत्यांची नावेही पुढे आली होती. मात्र कार्यकारिणीत त्याचे प्रतिबिंब उमटले नाही.पक्षाचे ज्येष्ठ नेते व नागपूरचे खासदार नितीन गडकरी हे सध्या केंद्रात मंत्री आहेत तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रदेश भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी आहेत. त्यामुळे कदाचित नागपूरचा विचार झाला नसावा असा पक्षात मतप्रवाह आहे. मात्र विदर्भातील इतर जिल्ह्यात पक्षाकडे ज्येष्ठ नेते मंडळी आहेत. स्वतंत्र विदर्भाचीही मागणी सध्या जोरात आहे. भाजपचाही त्याला पाठिंबा आहे. या पार्श्वभूमीवर या भागातील नेत्यांना कार्यकारिणीत सामावून घेऊन विदर्भाला न्याय देण्याची भूमिका घेता आली असती, त्यातून एक वेगळा संदेश कार्यकर्त्यांमध्ये गेला असता,अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. दरम्यान राष्ट्रीय कार्यकारिणी तयार करताना नेतृत्वाला राज्यांचा समतोल साधावा लागतो. त्यात राज्यांतर्गत विभागांचा विचार होत नाही. राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातून चार जणांचा समावेश करण्यात आला आहे, याकडे एका नेत्याने लक्ष वेधले. नागपूरला संघ मुख्यालय असल्याने भाजपमध्ये या शहराला वेगळे महत्त्व आहे. त्यामुळेच नागपूर किंवा विदर्भातील नेत्यांचा समावेश कार्यकारिणीत अपेक्षित होता, अशी प्रतिक्रियाही व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)