शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील संत्रा बहराला गळती सुरूच

By admin | Updated: September 9, 2014 04:45 IST

विदर्भातील संत्रा पिकाला बदलत्या हवामानाची झळ बसली असून, यंदा संत्र्याला बहर गळती सुरू झाली आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकर्‍यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.

 अकोला : विदर्भातील संत्रा पिकाला बदलत्या हवामानाची झळ बसली असून, यंदा संत्र्याला बहर गळती सुरू झाली आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकर्‍यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. यापृष्ठभूमिवर संत्रा उत्पादक शेतकर्‍यांनी शासनाला निवेदन देऊन संत्रा उत्पादकांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.राज्यात सर्वाधिक १ लाख ५0 हेक्टर संत्रा फळ पिकाचे क्षेत्र विदर्भात आहे. परंतु सतत बदलत असलेल्या हवामानामुळे, संत्रा फळे व क्षेत्र वाढीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. यावर्षीही तेच चित्र असून, जवळपास महिनाभर पाऊसच नसल्याने तापमान प्रचंड वाढले होते. त्यामुळे संत्र्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. मोठय़ा प्रमाणात बहर गळती सुरू झाल्याने संत्रा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. डिंक्या या रोगाचा सामना करणार्‍या संत्र्यावर (कोलॅकोट्रायकम) मूळकूजसारखा बुरशीजन्य रोगाचाही प्रादुर्भाव वाढत असल्याने बहर गळतीत वाढ झालेली आहे. रोजगार हमी योजना व राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत राज्यात फळबाग लागवड योजना राबविण्यात आल्याने फळ क्षेत्र व उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आला आहे. राज्यात केळी ८२ हजार हेक्टर, द्राक्ष ९0 हजार हेक्टर, पेरू ३९ हजार हेक्टर, आंबा ४८२ हजार हेक्टर, पपई १0 हजार हेक्टर, लिंबूवर्गीय फळे २७७ हजार हेक्टर, डाळिंब ७८ हजार हेक्टर, चिकू ७३ हजार हेक्टर तर इतर फळ पिके जवळपास ४१८ हजार हेक्टर क्षेत्रावर आहे. प्रतिकुल हवामानामुळे संत्रा उत्पादक शेतकरी यंदा अडचणीत सापडला आहे. विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी संत्र्यांवर येणार्‍या डिंक्या या रोगाचा सामना नेहमीच करीत असतो; तथापि यावेळी वातावरणात बदल झाला असून, सतत बदलत असलेल्या हवामानामुळे बुरशीजन्य कोलॅटोट्रायकम रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. या रोगाच्या व्यवस्थापनासाठी कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार औषधांची फवारणी करावी.