शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भामधील दुष्काळग्रस्तांचे लोंढे नवी मुंबईमध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 06:58 IST

दुष्काळामुळे विदर्भातील दुष्काळग्रस्तांचे लोंढे नवी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. वाशीम व यवतमाळ जिल्ह्यामधून हजारो शेतकरी व शेतमजुरांनी कुटुंबासह मार्च महिन्यापासूनच नवी मुंबईत स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई  - दुष्काळामुळेविदर्भातीलदुष्काळग्रस्तांचे लोंढे नवी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. वाशीम व यवतमाळ जिल्ह्यामधून हजारो शेतकरी व शेतमजुरांनी कुटुंबासह मार्च महिन्यापासूनच नवी मुंबईत स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही जिल्ह्यांमधील कुटुंबांनी सानपाडा येथील दत्त मंदिराजवळील उड्डाणपूल, नेरूळ, जुईनगर, एमआयडीसीमधील मोकळ्या भूखंडावर संसार थाटला आहे.पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल, अशा ठिकाणी निवारा करून उघड्यावरच दगडाची चूल करून त्यावर स्वयंपाक केला जात आहे. ते सकाळी तुर्भे, नेरूळ व वाशीमधील नाक्यावर कामाच्या शोधात उभे राहत आहेत. बहुतांश दुष्काळग्रस्त नाका कामगार म्हणून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.दुष्काळामुळे गावाकडे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. एक ते दोन किलोमीटर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शेतीमध्ये काही पिकत नाही व गावाकडे रोजगाराचे कोणतेच साधन नसल्यामुळे स्थलांतर करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याची माहिती त्यांनी दिली.महापालिका प्रशासनाने दुष्काळग्रस्तांसाठी तात्पुरत्या स्वरूपात पाणी, आरोग्य सुविधा, फिरते शौचालय उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी दुष्काळग्रस्तांनी केली आहे.गावामध्ये पाण्याची सोय नाही, मुलाचा ४० वर्षांपूर्वीच मृत्यू झाला आहे. नातवाचा अपघात झाल्यामुळे उपचारासाठी कर्ज काढावे लागले. गावाकडे रोजगारही मिळत नसल्यामुळे मुंबईत आलो असून, पावसाळ्यापर्यंत येथेच थांबणार आहोत.- शंकर कालापहाड, बाभूळगाव, वाशिमगावी दोन एकर जमीन आहे; पण दुष्काळामुळे काही पिकत नाही. नाका कामगार म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे.- भारत गोविंद महाजन,माळवा, (ता. महागाव, जि. यवतमाळ)दुष्काळामुळे शेती ओस पडली आहे. मजुरीची कामेही मिळत नाहीत. उपासमारीची वेळ आल्यामुळे येथे मिळेल ते काम करून उपजीविका करत आहोत.- अमृत सखाराम गजभार, बोरगाव (ता. मालेगाव, जि. वाशिम)फेब्रुवारी महिन्यापासून गावात पाणीटंचाई सुरू झाली आहे. येथे रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहोत.- वंदना कालापहाड, मांडवा डिब्रस (ता. हरसूल, जि. यवतमाळ)मुंबईतही समस्यांचा डोंगरविदर्भातील दुष्काळग्रस्तांच्या समस्या मुंबई व नवी मुंबईमध्ये आल्यानंतरही संपलेल्या नाहीत. येथे पुलाखाली उघड्यावरच दगडाची चूल करून स्वयंपाक करावा लागत आहे. मंदिर किंवा गळती सुरू असलेल्या जलवाहिनीवरून पाणीभरावे लागत आहे. रात्री पुलाखाली व मोकळ्या भूखंडावर थांबणे धोकादायक असल्याने अनेक जण रेल्वे स्टेशन, पादचारी पुलावर मुक्कामासाठी जात आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रdroughtदुष्काळVidarbhaविदर्भMumbaiमुंबई