शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात वाघांची संख्या घटली!

By admin | Updated: May 28, 2014 23:56 IST

विदर्भात वाघांची संख्या घटली!

विदर्भात वाघांची संख्या घटली!व्याघ्र प्रकल्पांची लपवाछपवी : सीबीआयचा अभ्यासाअंती निष्कर्षगणेश वासनिक / अमरावती : विदर्भातील वाघांची आकडेवारी फुगवून सांगण्यात व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी जोरकस प्रयत्न करीत असले तरी वाघांची संख्या घटल्याचे वास्तव पुढे आले आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने नुकत्याच मेळघाट, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊन अभ्यासाअंती हा निष्कर्ष काढल्याचे सूत्रांनी सांगितले़ मागील दोन वर्षांत विदर्भात पाच ते सात वाघांची हत्या तर दोन ते तीन वाघांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याचे ठरविले. त्यानुसार सीबीआयच्या त्रिसदस्यीय पथकाने मेळघाट, ताडोबा व पेंच येथील व्याघ्र प्रकल्पाचा पाहणी दौरा केला. या चमुने अद्यापपर्यत शासनाला अहवाल सादर केला नाही़; मात्र तीन वर्षांत विदर्भात १० ते १२ वाघांची हत्या झाल्याच्या निष्कर्षाअंती हे पथक पोहचले आहे़ मागील व्याघ्र प्रगणेच्या तुलनेत विदर्भात वाघांची संख्या २५ ते ३० ने घटल्याचे दिसून यंेईल़ वाघांची हत्या आणि नैसर्गिक मृत्युच्या घटनांमुळे व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांच्या रिक्त जागा भरण्यात आल्यात. एवढेच नव्हे तर त्यांना शस्त्रे, वाहने उपलब्ध करून देण्यात आली. शिकार्‍यांचा बंदोबस्त करण्याच्या अनुषंगाने पेंच व ताडोबा येथे व्याघ्र संरक्षण दल स्थापन करण्यात आले. मात्र, मेळघाटात व्याघ्र संरक्षण दल स्थापन करण्याच्या दृष्टिने कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. येथे वाघांची संख्या आणि संरक्षणबाबत लपवाछपवी सुरू असल्याचे चित्र आहे. काही वर्षांपासून मेळघाटात ५९ वाघ असल्याची आकडेवारी वनविभागाच्या रेकॉर्डवर कायम आहे. मेळघाटात वाघांसाठी पोषक वातावरण असल्याचे सीबीआयच्या पथकाने स्पष्ट केले आहे. मात्र येथे शिकार्‍यांनी पायमुळे घ˜ रोवल्याचा निष्कर्ष देखील त्यांनी काढला आहे. मेळघाटात शिकार्‍यांना पायबंद घालणे, हे वनविभागापुढे मोठे आव्हान आहे. यासंदर्भात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक दिनेश त्यागी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़ मात्र, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.------------------------------------मास्टर माईंडपर्यत पोहचण्यात अपयशमध्यंतरी ताडोबा, पेंच, मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघांची हत्या झाल्यानंतर नागपूर वनविभागाने काही वनतस्करांना वाघांच्या कातड्यासह ताब्यात घेतले. या तस्करांनी मेळघाटात वाघ मारल्याची कबुली दिली. त्यानंतर या तस्करांना मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ताब्यात दिले. पूर्व मेळघाट वनविभागात वाघाची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर या आरोपींच्या माध्यमातून वनविभागाने एक एक कडी उलगडली. मात्र हा तपास पुणे येथे जाऊन थांबला. परिणामी मास्टर माईंडपर्यत वनविभाग पोहचू शकला नाही. वाघांच्या शिकारी करण्यामागे कोण? हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.------------------------------------