विदर्भ- मेळघाटातील वाघिणीच्या शिकाऱ्यांना पाच वर्षे सक्तमजुरी

By Admin | Updated: June 19, 2014 03:11 IST2014-06-19T03:11:25+5:302014-06-19T03:11:25+5:30

मेळघाटातील ढाकणा परिक्षेत्रात वाघिणीची शिकारप्रकरणीचा विदर्भातील पहिला निकाल येथील न्यायालयाने आज बुधवारी दिला.

Vidarbha - Five Years Right for Waghenessers in Melghat | विदर्भ- मेळघाटातील वाघिणीच्या शिकाऱ्यांना पाच वर्षे सक्तमजुरी

विदर्भ- मेळघाटातील वाघिणीच्या शिकाऱ्यांना पाच वर्षे सक्तमजुरी

नरेंद्र जावरे, अमरावती
मेळघाटातील ढाकणा परिक्षेत्रात वाघिणीची शिकारप्रकरणीचा विदर्भातील पहिला निकाल येथील न्यायालयाने आज बुधवारी दिला. यात तिघांना पाच वर्षे सक्तमजुरी व रोख दंडाची शिक्षा सुनावली तर पुराव्याअभावी चौघांची निर्दोष सुटका करण्यात आली.
मधुसिंग लहेरसिंग राठोड (३५), चिंतराम लहेरसिंग राठोड (४०), विनोद प्रेमलाल पवार (३० सर्व रा. सिनबन) असे न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत. पुराव्याअभावी सागरलाल पवार, नरविलाल पवार, रुचलेसिंग पवार व मिश्रीलाल चव्हाण या तिघांची निर्दोष सुटका करण्यात आली.
याआरोपींना मुख्य न्यायदंडाधिकारी विशाल राजे यांच्या न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी रोख पन्नास हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्षे पुन्हा सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. विदर्भात गतवर्षी उघडकीस आलेल्या वाघशिकार प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागांतर्गत ढाकणा परिक्षेत्रातील वाघिणीच्या शिकार प्रकरणात तीन वेगवेगळे प्रकरण दाखल आहेत.

Web Title: Vidarbha - Five Years Right for Waghenessers in Melghat