कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार वेंकटेश्वरलूकडे!

By Admin | Updated: December 19, 2014 23:23 IST2014-12-19T23:10:05+5:302014-12-19T23:23:05+5:30

कोकण कृषी विद्यापीठ : पात्र उमेदवार न मिळाल्याने कुलगुरुपद रिक्त

Vice Chancellor additional workload of Venkateswarlu! | कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार वेंकटेश्वरलूकडे!

कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार वेंकटेश्वरलूकडे!

 दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. किसन लवांडे यांचा कार्यकाल संपल्याने दापोली कोकण कृ षी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु प्रभारी डॉ. बी. वेंकटश्वरेलू यांची नियुक्ती करण्यात आली असून, २१ डिसेंबर रोजी अतिरिक्त कार्यभार ते स्वीकारणार आहेत.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. किसन लवांडे १९ डिसेेंबर रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. कुलगुरुपदाची वयोमर्यादा ६५ वर्षे करण्यात आल्याने त्यांचा कार्यकाल संपला आहे. डॉ. किसन लवांडे यांना कुलगुरु म्हणून केवळ साडेतीन वर्षे काम करण्याची संधी मिळाली. विद्यापीठाच्या कुलगुरु कार्यकालाची वयोमर्यादा ७० करावी, अशी मागणी विचाराधीन होती. मात्र, राज्यपाल यांनी सरकारकडे प्रस्ताव सादर न केल्याने व त्याबाबत सरकारचे शिक्कामोर्तब न झाल्याने कुलगुरुपदाच्या वयोमर्यादेचा मुद्दा कायम राहिल्याने डॉ. किसन लवांडे यांची कुलगुरुपदाची मुदतवाढ होऊ शकली नाही. डॉ. किसन लवांडे यांना मुदतवाढ मिळेल, असे वाटत असतानाच अचानक राज्यपाल यांनी परभणी
कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी. वेंकटेश्वरलू यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविल्याने लवांडे यांच्या मुदतवाढीला पूर्णविराम मिळाला आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. किसन लवांडे यांचा कार्यकाल संपण्याआधी दोन महिन्यांपासून कुलगुरु निवड प्रक्रिया सुरू झाली होती. कुलगुरु निवड समितीने शासनाच्या नियमाला अधीन राहून दोन महिन्यांपूर्वी कुलगुरुपदासाठी इच्छुक शास्त्रज्ञाकडून अर्ज मागवून घेतले होते. अर्जाची छाननीसुद्धा घेण्यात आली. मात्र, दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाला योग्य पात्रतेचा शास्त्रज्ञ न मिळाल्याने ऐनवेळी अतिरिक्त पदभार देऊन दापोली कृ षी विद्यापीठाचा गाडा हाकला जाणार आहे.


२००८ पासून पद रिक्त

Web Title: Vice Chancellor additional workload of Venkateswarlu!