शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात देखाव्यात ठेवले चक्क जिवंत पक्षी

By admin | Updated: September 14, 2016 04:27 IST

शहरातील यूएफसी गणेश मंडळाने प्राण्यांचा देखावा साकारला आहे. पण यासाठी चक्क जिवंत लव्ह बर्ड, पाळीव उंदीर, पोपट ठेवले आहेत

उल्हासनगर : शहरातील यूएफसी गणेश मंडळाने प्राण्यांचा देखावा साकारला आहे. पण यासाठी चक्क जिवंत लव्ह बर्ड, पाळीव उंदीर, पोपट ठेवले आहेत. याला अ‍ॅड. जय गायकवाड यांनी आक्षेप घेतला. प्राण्यांना क्रूरतेने वागवत असल्याबद्दल मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात केली आहे. दरम्यान, हिराली फाऊंडेशनच्या मदतीने या पक्ष्यांंची बुधवारी सुटका केली जाणार आहे.सतरामदास हॉस्पिटल परिसरात हे मंडळ आहे. प्रत्येक वर्षी नावीण्यपूर्ण देखावा मंडळ करत असते. यावर्षी त्यांनी पर्यावरणाचा ऱ्हास व प्राणी संकटात असा देखावा निर्माण केला आहे, असे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. गणेश मंडळ परिसरात पक्ष्यांवर आधारित चित्रही रेखाटली असून पक्ष्याचा पुतळाही उभारला आहे. नागरिकांमध्ये पक्ष्यांबाबत माहिती आणि जनजागृतीसाठी बाप्पाच्या समोरच लव्ह बर्डस्, विविध जातींचे पोपट व पाळीव उंदीर ठेवले आहेत. यामुळे मंडळावर टीका होत आहे. अ‍ॅड गायकवाड यांनी याबाबतची माहिती पोलीस उपायुक्त सुनील भारद्बाज यांना दिली. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र सिरसाट यांनी गणेश मंडळाला भेट दिली. कायद्यानुसार हे पक्षी, प्राणी जर प्रतिबंधात्मक पक्ष्यांच्या यादीत येत असतील तर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच उपायुक्त भारद्वाज यांनीही विठ्ठलवाडी पोलिसांना चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. यूएफसी मंडळाचे प्रमुख दिलीप वलेच्छा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल बंद होता. मात्र इतर पदाधिकाऱ्यांनी कायद्यानुसार प्राणी ठेवणे चुकीचे असेल तर पिंजऱ्यात ठेवलेल्या पक्ष्यांना मुक्त केले जाईल असे सांगितले. (प्रतिनिधी)