“वैष्णवीचे हे हरामखोर मारेकरी फाशीवरचं लटकायला हवेत”, भाजपा आमदाराचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 13:13 IST2025-05-29T13:13:40+5:302025-05-29T13:13:57+5:30
Vaishnavi Hagawane Death Case And BJP Chitra Wagh : वकिलाच्या युक्तिवादानंतर भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.

“वैष्णवीचे हे हरामखोर मारेकरी फाशीवरचं लटकायला हवेत”, भाजपा आमदाराचा संताप
वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी संताप व्यक्त होत असताना आरोपीच्या वकिलाने मृत वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही, असा अजब युक्तिवाद केला. वैष्णवीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेला पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांच्या कोठडीची मुदत संपली. त्यामुळे त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले होते.
वकिलाच्या युक्तिवादानंतर भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. “खवीसाला कसे सगळेच खवीस मिळत जातात तसे हे हगवणे व त्यांची बाजू मांडणारे. पुणे पोलीस एकेक पुरावा गोळा करा…. वैष्णवीचे हे हरामखोर मारेकरी फाशीवरचं लटकायला हवेत यांचे जीव जाईस्तोवर…” असं म्हटलं आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
खवीसा ला कसे सगळेच खवीस मिळत जातात तसे हे हगवणे व त्यांची बाजू मांडणारे….
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 28, 2025
पोरीला हालहाल करून मारून टाकलीत अजून मन नाही भरलं तर मारल्यानंतरही तिच्या चारित्र्यावर बोलतां अरे हरामखोरांनो लांडग्याच्या पुढची औलाद आहे रे तुमची….माणसं नाहीचं तुम्ही…
पाईपाने मारमार मारलं …शरीराचा…
“पोरीला हालहाल करून मारून टाकलीत"
“खवीसाला कसे सगळेच खवीस मिळत जातात तसे हे हगवणे व त्यांची बाजू मांडणारे… पोरीला हालहाल करून मारून टाकलीत अजून मन नाही भरलं तर मारल्यानंतरही तिच्या चारित्र्यावर बोलता अरे हरामखोरांनो लांडग्याच्या पुढची औलाद आहे रे तुमची... माणसं नाहीचं तुम्ही… पाईपाने मारमार मारलं… शरीराचा कुठला भाग असा नव्हता ज्यावर मारहाणीचे व्रण नव्हते.. हे असले युक्तीवाद करून काय साध्य करायचाय तुम्हाला…. पुणे पोलीस एकेक पुरावा गोळा करा…. वैष्णवीचे हे हरामखोर मारेकरी फाशीवरचं लटकायला हवेत यांचे जीव जाईस्तोवर…” असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
“वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅटिंग सुरू”
ॲड. विपुल दुशिंग यांनी आरोपींच्या वतीने युक्तिवाद केला. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅटिंग सुरू होते. ते पकडले होते. त्याची माहिती आम्हाला हवी आहे. वैष्णवीची टेन्डन्सी सुसाइड करण्याची होती. तिचे एका व्यक्तीसोबतचे चॅट पकडले गेले होते. त्यातूनच तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला. एकदा रॅट पॉइझन घेऊन आणि एकदा गाडीतून उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी शशांक, लता आणि करिश्मा हगवणे यांची पोलिस कोठडी एक दिवसाने, तर राजेंद्र आणि सुशील यांची पोलिस कोठडी ३१ मेपर्यंत वाढविली. फरार दीर, सासरा यांना आश्रय दिला म्हणून अटक केलेल्या प्रीतम वीरकुमार पाटील (४७, रा. कोगनोळी, ता. चिकोडी, जि. बेळगाव), मोहन ऊर्फ बंडू उत्तम भेगडे (६०, रा. वडगाव मावळ), बंडू लक्ष्मण फाटक (५५, रा. लोणावळा), अमोल विजय जाधव (३५) आणि राहुल दशरथ जाधव (४५, दोघेही रा. पुसेगाव, जि. सातारा) यांना जामीन मंजूर झाला आहे.