विठ्ठलाच्या गाभा-यात वासा कोसळला

By Admin | Updated: January 14, 2015 03:54 IST2015-01-14T03:54:05+5:302015-01-14T03:54:05+5:30

कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल मंदिरातील विठ्ठलाच्या गाभाऱ्यात लाकडी वासा मखरावर कोसळला.

The Vaasa collapsed in Vitthal's core | विठ्ठलाच्या गाभा-यात वासा कोसळला

विठ्ठलाच्या गाभा-यात वासा कोसळला

पंढरपूर : कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल मंदिरातील विठ्ठलाच्या गाभाऱ्यात लाकडी वासा मखरावर कोसळला. मखरामुळे मूर्ती वाचली आणि शेजारी उभ्या असलेल्या ज्ञानेश मुंगसे या पुजाऱ्याच्या पाठीवर हा वासा पडला. ही घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास घडली.
विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठल मूर्तीच्या बरोबर डोक्यावर मंदिराचा कळस आहे. कळसाच्या मध्यभागी दोन-दोन फुटांचे चार वासे लावले आहेत. त्यापैकी एक वासा मंगळवारी रात्री कोसळला. विठ्ठल मूर्तीच्या सभोवताली चांदीचे मखर आणि डोक्यावर छत्री केली असल्याने कळसातून थेट विठ्ठल मूर्तीच्या डोक्यावर पडणारा वासा छत्रीवर पडला. त्याचे दोन-तीन तुकडे झाले आणि मखराच्या शेजारी उभ्या असलेल्या ज्ञानेश मुंगसे यांच्या पाठीवर पडले. त्यात ते किरकोळ जखमी झाले.
दोन दिवसांवर संक्रातीचा सण असल्याने विठ्ठल-रुक्मिणी चे दर्शन घेण्यासाठी आजपासूनच भाविकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे रात्री नऊच्या सुमारासही सुमारे तीनशे भाविक मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्याच वेळी ही घटना घडल्याने काही वेळ मंदिरात खळबळ उडाली आणि दर्शन रांग थांबविण्यात आली. त्यानंतर तातडीने मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी तुटलेला वासा बाजूला काढला व पुन्हा दर्शन सुरळीत सुरु झाले.
मात्र या घटनेबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत होती. त्यामुळे बाहेर उभ्या असणाऱ्या सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनाही या गोष्टीची कोणतीच खबर नव्हती. (प्रतिनिधी)

Web Title: The Vaasa collapsed in Vitthal's core