शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

राज्यात पहिल्यांदाच वेबिनारचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 5:44 AM

राज्यातील रस्त्यांच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘हायब्रीड अ‍ॅन्युइटी मॉडेल’वर आधारित रस्ते बांधणीसाठी ‘उत्कर्ष महामार्ग’ ही योजना सुरू केली आहे.

मुंबई : राज्यातील रस्त्यांच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘हायब्रीड अ‍ॅन्युइटी मॉडेल’वर आधारित रस्ते बांधणीसाठी ‘उत्कर्ष महामार्ग’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेची माहिती देण्यासाठी राज्यात पहिल्यांदाच ‘वेबिनार’ (लाइव्ह व्हिडीओ कॉन्फरन्स)चे आयोजन करण्यात आले. मंगळवार, ५ डिसेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील वेबिनारद्वारे एकाचवेळी जगभरातील २५० कंत्राटदारांशी संवाद साधणार आहेत.हायब्रीड अ‍ॅन्युइटी पद्धतीने राज्यातील रस्त्यांचा विकास केला जाणार आहे. राज्य शासन आणि कंत्राटदार संयुक्तपणे ही योजना राबवतील. या योजनेंतर्गत राज्यातील ३० हजार किमी रस्त्यांची बांधणी केली जाईल. पहिल्या टप्प्यात दोन वर्षांत १० हजार किमीचे रस्ते उभारण्यात येतील. त्यासाठी राज्य सरकार कंत्राटदारांना सुरुवातीला ६० टक्के आणि नंतरच्या १० वर्षांत ४० टक्के रक्कम देणार आहे.या योजनेमुळे प्रकल्पाची किंमत व कालावधी यामध्ये खूप मोठा फरक पडेल. कंत्राटदारांना या योजनेची माहिती देण्यासाठी वेबिनारचे आयोजन करण्यात येईल. वेबिनारमुळे रस्तेनिर्मितीच्या व्यवसायात असणारे जगभरातील २५० कंपन्यांचे प्रतिनिधी एकाचवेळी त्यांच्या त्यांच्या ठिकाणी बसून वेबिनारच्या माध्यमातून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संवाद साधतील. वेबिनारच्या दरम्यान कंत्राटदारांना ‘उत्कर्ष महामार्ग’ या प्रकल्पाची माहिती, रस्त्यांचे आयुष्यमान, कंत्राटासाठी पात्रतेचे निकष आदी माहिती देण्यात येईल.

टॅग्स :highwayमहामार्गMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार