शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘यूपीआय’ अपहार; दोन सूत्रधारांना अटक

By admin | Updated: March 17, 2017 03:35 IST

महाराष्ट्र बँकेच्या खातेदारांच्या खात्यातून यूपीआय अ‍ॅपद्वारे पैसे काढून ६ कोटी १४ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी औरंगाबाद येथील आनंद लाहोटी आणि किरण

पुणे : महाराष्ट्र बँकेच्या खातेदारांच्या खात्यातून यूपीआय अ‍ॅपद्वारे पैसे काढून ६ कोटी १४ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी औरंगाबाद येथील आनंद लाहोटी आणि किरण गावडे या दोघांना पकडण्यात पुणे शहर पोलीस दलाच्या सायबर सेलला यश आले आहे़ या दोघांच्या अटकेमुळे या प्रकरणातील महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागणार आहे़याप्रकरणी पोलिसांनी याआधी अशोक बबनराव हांडे (४९, रा. पिंपळगाव जोगा, ता. जुन्नर), दिनेश सयाजी मोढवे (४१, रा. मढ, ता. जुन्नर), संतोष प्रकाश शेवाळे (३७, रा. शिक्रापूर, ता. शिरुर), राजेश काबरा व पंकज पिसे या पाच जणांना अटक केली. त्यांच्या चौकशीत लाहोटी आणि गावडे यांची नावे समोर आली. अधिक तपासात पोलिसांना बुलडाणा, नाशिक, वाशिम येथील त्यांच्या अन्य ९ साथीदारांची नावेही मिळाली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.महाराष्ट्र बँकेतील खात्यांमधून यूपीआय अ‍ॅपद्वारे खात्यात पैसे नसतानाही पैस काढून त्याचा अपहार करण्याच्या प्रकरणाची सुरुवात औरंगाबाद येथून झाली होती़ त्याचा मुख्य सूत्रधार आनंद लाहोटी आहे़ त्याने किरण गावडे याच्या सहाय्याने राजेश काबरा, पंकज पिसे यांच्यामार्फत लोकांकडील महाराष्ट्र बँकेच्या खातेदारांचे सीमकार्ड मिळवून त्याद्वारे कोट्यावधी रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे़तर, अशोक हांडे, दिनेश मोढवे व संतोष शेवाळे या तिघांच्या बँक खात्यांची माहिती घेतली असता प्रत्येकाच्या खात्यातून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचे दिसून येत आहे़ (प्रतिनिधी)