शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आगामी वर्ष ‘समता-समरसता’ वर्ष

By admin | Updated: May 7, 2015 11:31 IST

महात्मा फुले यांची १२५ वी पुण्यतीथी तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीचे औचित्य साधत आगामी वर्ष सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे.

मुंबई : महात्मा फुले यांची १२५ वी पुण्यतीथी तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीचे औचित्य साधत आगामी वर्ष सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समतागौरव व समाजभूषण पुरस्कारांचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, समता-समरसता हे विषय भाषणातून नव्हे तर कृतीतून दाखविण्याचे आहेत याच भूमिकेवर राज्य शासन काम करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ होते. आर्थिक बाबींवरील त्यांचे विचार पथदर्शी होते. त्यांचे आर्थिक विचार समोर आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. या वेळी ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, उद्योजक मिलिंद कांबळे, पत्रकार यदू जोशी आणि संगीतकार प्रभाकर धाकडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये रोख, मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर स्नेहल आंबेकर उपस्थित होते. समाजभूषण पुरस्कारांचे मानकरी संस्था- हॅपी होम अँड स्कूल फॉर दी ब्लाइंड-मुंबई, अन्नपूर्णा परिवार-पुणे, अपंग कल्याणकारी शिक्षण संस्था व संशोधन केंद्र-पुणे , श्री बाबूराव राघोजी देशमुख शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, कला व क्रीडा सेवाभावी संस्था-कागल, संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्र-लातूर, गोविंद महाराज गोपाल समाज विकास परिषद-निलंगा, दिनदयाल बहु.प्रसारक मंडळ-यवतमाळ, संपूर्ण बांबू केंद्र-अमरावती, बहुभुती शिक्षण संस्था-गोंदिया, मातृसेवा संघ- नागपूर. समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती : जयश्री कांबळे, दुर्गादास साबळे, चंद्रकांत गांगुर्डे, विनोद प्रजापती, किशोर रोहम, दत्तात्रय पांडव (मुंबई), सुभाष वाणी (रत्नागिरी), मोहन कदम, चंद्रकांत जाधव (सिंधुदुर्ग).