शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यानंतर उकल :प्रियकराकडून विवाहिता प्रेयसीची हत्या

By admin | Updated: March 16, 2017 15:14 IST

ज्योती पवार नामक विवाहितेचा मृतदेह असून तिची हत्त्या प्रियकराने केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

नाशिक : गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात वासाळी शिवारातील डोंगराच्या पायथ्याशी आढळून आलेल्या एका अज्ञात महिलेच्या मृतदेहाची ओळख पटविण्यास पोलिसांना यश आले आहे. ज्योती पवार नामक विवाहितेचा मृतदेह असून तिची हत्त्या प्रियकराने केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील वासाळी शिवारातील एका डोंगराच्या निर्जन परिसरात १९ डिसेंबर रोजी अज्ञात महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. सदर मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये असल्याने पोलीसांचा संशय अधिक बळावला होता. महिलेचा घातपात झाल्याचा प्राथमिक अंदाज सातपूर पोलिसांनी वर्तविला होता. पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल, उपआयुक्त श्रीकांत धीवरे, सहाय्यक आयुक्त अतुल झेंडे यांनी चर्चा करुन तपासाला गती दिली. सदर महिलेच्या डोक्यावर व मानेवर धारधार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांना पंचनाम्यात निदर्शनास आले; मात्र संशयिताने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे महिलेचा चेहरा जळालेला होता. यामुळे मृतदेहाची ओळख पटविणे पोलिसांपुढे आव्हान होते.

गोपनिय माहितीच्या आधारे एका बेपत्ता झालेल्या माहिलेच्या आईकडे विचारपूस केल्यानंतर तिच्याकडून काही माहिती हाती आली. त्याआधारे पोलिसांनी तपासाला पुढे दिशा दिल्यानंतर महिलेचा एका मनिष गिरासे नावाच्या इसमासोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. पोलिसांने गिरासेचा शोध घेत त्यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान, त्याने प्रथम सदर महिलेसोबत त्याची कोणतीही ओळख नसल्याचे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसांनी ‘खाक्या’ दाखविल्यानंतर ‘सुंदरी’च्या भीतीपोटी त्याने केलेला गुन्हा कबुल केल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे. धारधार शस्त्राने खून करून गिरासे याने पेट्रोल टाकून महिलेचा मृतदेह पेटवून देत घटनास्थळावरुन पळ काढला होता, असे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.