भाजपाला जागा वाढवून देणे अशक्य - उद्धव ठाकरे

By Admin | Updated: September 15, 2014 13:20 IST2014-09-15T13:02:04+5:302014-09-15T13:20:59+5:30

भाजपाला जागा वाढवून देणे अशक्य असल्याचे सांगत युतीतील पक्षांनी जागावाटपावरुन जास्त खेचाखेची करु नये असा सूचक इशारा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला आहे.

Unlikely to increase BJP space - Uddhav Thackeray | भाजपाला जागा वाढवून देणे अशक्य - उद्धव ठाकरे

भाजपाला जागा वाढवून देणे अशक्य - उद्धव ठाकरे

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १५ - भाजपाला जागा वाढवून देणे अशक्य असल्याचे सांगत युतीतील पक्षांनी जागावाटपावरुन जास्त खेचाखेची करु नये असा सूचक इशारा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला आहे. जागा वाटपावर चर्चा सुरु असून यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे स्पष्टीकरणही उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. 
व्हिजन डॉक्यूमेंटचा तिसरा टप्पा सोमवारी जाहीर करण्यात आला. या पत्रकार परिषदेत युतीतील तणावाविषयी उद्धव ठाकरे म्हणाले,प्रत्येकाला  पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. युती २५ वर्ष जूनी आहे, ती तुटू नये यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहे. मात्र शेवटी प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो असे सूचक विधान ठाकरे यांनी केले आहे. जागावाटपावरून कृपया खेचाखेची करू नये, राज्यात चांगले वातावरण आहे, आघाडी सरकारला धुळीस मिळवून सत्ता स्थापन करण्याची चांगली संधी हातात असल्याचे सांगत ही युती अभेद्य राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
जागावाटपावरून सध्या युतीत तणावाचे वातावरण आहे. शिवसेनेबरोबर जागावाटपाची चर्चा करण्याकरिता भाजपाच्या नेत्यांनी मातोश्री गाठले होते. मात्र एकही जागा वाढवून देणार नाही, असा ठाम पवित्रा शिवसेनेने बैठकीत घेतला. लोकसभा निवडणुकीत भाजपाला जास्त जागा तर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला जास्त जागा हे सूत्र वर्षानुवर्षे ठरलेले असून त्यामध्ये बदल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे शिवसेनेने स्पष्ट केले होते. 

 

Web Title: Unlikely to increase BJP space - Uddhav Thackeray