नारायण राणेंच्या कामगिरीवर पक्षश्रेष्ठी खुश; अमित शाह कोकण दौऱ्यावर जाणार

By देवेश फडके | Published: January 29, 2021 05:31 PM2021-01-29T17:31:14+5:302021-01-29T17:34:10+5:30

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या दौऱ्याबाबत अनिश्चितता होती. मात्र, आता अमित शाह यांचा कोकण दौरा नक्की झाल्याचे सांगण्यात येत आहे.

union home minister amit shah will visit konkan in february to attend narayan rane college ceremony | नारायण राणेंच्या कामगिरीवर पक्षश्रेष्ठी खुश; अमित शाह कोकण दौऱ्यावर जाणार

नारायण राणेंच्या कामगिरीवर पक्षश्रेष्ठी खुश; अमित शाह कोकण दौऱ्यावर जाणार

Next
ठळक मुद्देकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोकण दौऱ्यावरनारायण राणे यांच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावणारग्रामपंचायत निवडणुकांतील कामगिरीमुळे नारायण राणे यांचे पक्षातील वजन वाढल्याची चर्चा

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुढील महिन्यात कोकण दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. भाजप खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात बांधलेल्या लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका कार्यक्रमाला अमित शाह उपस्थित राहणार आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या दौऱ्याबाबत अनिश्चितता होती. मात्र, आता अमित शाह यांचा दौरा नक्की झाल्याचे सांगण्यात येत आहे.

अमित शाह यांचा कोकण दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. ०६ फेब्रुवारी २०२१ रोजी अमित शाह कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. सिंधुदुर्गातील लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हेही हजेरी लावणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

महाराष्ट्रात २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन वाढला; अनलॉक अंतर्गत देण्यात आलेली सूट कायम

दरम्यान, महाराष्ट्रात अलीकडेच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपला चांगले यश मिळाले. नारायण राणे यांच्या नेतृत्त्वामुळे कोकणातील शिवसेनेच्या वर्चस्वाला आव्हान देणे भाजपला साध्य करता आले, असे म्हटले जात आहे. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठी नारायण राणे यांच्या कामगिरीवर खुश असून, नारायण राणे यांचे पक्षातील वजन वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

तसेच महाराष्ट्र सरकराने केलेल्या सुरक्षा कपातीनंतर नारायण राणे यांना थेट केंद्र सरकारकडून व्हाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. या सुरक्षेव्यवस्थेनुसार १२ सी.आय.एस.एफचे जवान नारायण राणे यांच्या सुरक्षा ताफ्यात तैनात असणार आहे. 

Web Title: union home minister amit shah will visit konkan in february to attend narayan rane college ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.