अनवाणी राहिलेल्या कार्यकर्त्यास आ. गायकवाडांनी दिली चप्पल भेट; १५ वर्षांपूर्वी घेतली शपथ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 02:56 AM2019-11-02T02:56:43+5:302019-11-02T02:56:51+5:30

निवडून आणण्याचा केला होता निश्चय

An unidentified activist arrives. Slippers gift given by Gaikwad; Sworn in 3 years ago | अनवाणी राहिलेल्या कार्यकर्त्यास आ. गायकवाडांनी दिली चप्पल भेट; १५ वर्षांपूर्वी घेतली शपथ

अनवाणी राहिलेल्या कार्यकर्त्यास आ. गायकवाडांनी दिली चप्पल भेट; १५ वर्षांपूर्वी घेतली शपथ

googlenewsNext

बुलडाणा : जोपर्यंत संजय गायकवाड आमदार होत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही, अशी शपथ घेऊन गेल्या १५ वर्षांपासून अनवाणी राहिलेल्या आपल्या कार्यकर्त्यासाठी आमदार झालेल्या गायकवाड यांनी डोक्यावर पादत्राणे घेऊन धाव घेतली आणि त्याचे पाय धुूवून सन्मानपूर्वक त्याच्या अनवाणी पायात ती घातली. या हृद प्रसंगाने शिवसेनेचे कार्यकर्ते आणि गावकरी भाऊक झाले होते.

मोताळा तालुक्यातील नेहरूनगर या गावात अनिल शंकर पवार हा आ. गायकवाड यांचा कार्यकर्ता आहे. २००४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत संजय गायकवाड यांचा पराभव झाला. तेव्हापासून अनिल यांनी कधी पायात चप्पल घातली नाही. संजय गायकवाड यांना आमदार म्हणून बघण्याची त्यांची जिद्द कमालीची होती. गायकवाड यांनी बऱ्याचदा समजावून सांगत पायात चप्पल घालण्याची विनंती केली होती.

मात्र, अनिल पवार यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत आपला दृढनिश्चय कायम ठेवला होता. आ. गायकवाड शुक्रवारी मुंबईहून बुलडाण्यात आले आणि त्यांना अनिल पवार यांची आठवण आली. त्यांनी या कार्यकर्त्यासाठी नवीन चप्पल घेत बुलडाणा शहरापासून सुमारे १५ किमी अंतरावर असलेले नेहरूनगर गाठत त्याला ती भेट दिली.

कार्यकर्त्याचे धुतले पाय
मोठ्या संघर्षातून राजकारणात आपले अस्तित्व कायम राखणाºया संजय गायकवाड यांनी नेहरूनगर गाठत अनिल पवार यांना एका खुर्चीवर बसवत त्यांचे पाय धुवून त्यांच्या पायात नवीन आणलेली चप्पल घातली. त्यावेळी गेल्या १५ वर्षातील दोघांच्याही संघर्षाचा पट उपस्थितांच्या डोळ्यासमोर तरळून गेला.

Web Title: An unidentified activist arrives. Slippers gift given by Gaikwad; Sworn in 3 years ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.