‘उल्हासनगरसाठी निधी कमी पडू देणार नाही’

By Admin | Updated: March 23, 2017 02:35 IST2017-03-23T02:35:37+5:302017-03-23T02:35:37+5:30

उल्हासनगरच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. लोकांच्या सूचना, हरकती लक्षात घेऊनच शहराचा विकास आराखडा अंतिम

'Ulhasnagar will not let the funds fall short' | ‘उल्हासनगरसाठी निधी कमी पडू देणार नाही’

‘उल्हासनगरसाठी निधी कमी पडू देणार नाही’

मुंबई : उल्हासनगरच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. लोकांच्या सूचना, हरकती लक्षात घेऊनच शहराचा विकास आराखडा अंतिम करण्यात येईल. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आराखडा निश्चित करून विकासकामे करण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे दिले.
उल्हासनगर विकास आराखड्याबाबत बुधवारी विधानभवन येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. शहरांचा विकास करताना केवळ काँक्रीटचे जंगल तयार करून उपयोग नाही, असेही ते यावेळी म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: 'Ulhasnagar will not let the funds fall short'