शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

...तर उदयनराजेंना अटक करणार: विश्वास नांगरे-पाटील

By admin | Updated: June 7, 2017 22:33 IST

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर खंडणी आणि मारहाणीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत 
कोल्हापूर, दि. 7 - राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर खंडणी आणि मारहाणीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सोना अलाईन कंपनीच्या मालकाने त्यांच्याविरोधात तक्रार केली होती. कायदा सगळ्यांसाठीच सारखा आहे, वेळ आलीच तर त्यांना अटक केली जाईल असं कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी ठणकावलं आहे. 
 
खंडणी आणि मारहाणीच्या आरोपाखाली उदयनराजे यांच्यावर सोना अलाईन कंपनीच्या मालकाने केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळला आहे. तर या प्रकरणातील 9 आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.  
 
याप्रकरणी बोलताना,  स्वत: पोलीस अधिक्षकांच्या देखरेखीखाली या खटल्याचा तपास सुरु आहे. कायदा हा सर्वांसाठी समान असतो , वेळ पडल्यास खासदारांवरही कारवाई होईल”, असं विश्वास नांगरे पाटील म्हणाले.
 
काय आहे प्रकरण-
साताऱ्यातल्या लोणंदमधे सोना अलाईज नावाची एक कंपनी आहे. या कंपनीत उदयराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली असलेली एक माथाडी कामगार संघटना आहे. तर दुसऱ्या संघटनेचे नेतृत्त्व रामराजे निंबाळकर करतात. ही कंपनी रामराजे निंबाळकर यांच्या कामगार संघटनेला झुकते माप देते असा आरोप उदयनराजे यांनी केला. त्यानंतर 18 फेब्रुवारीला उदयनराजेंनी कंपनीचे अधिकारी राजकुमार जैन यांना सातारा विश्रामगृहात बोलावून घेतलं. तेथे पोहोचल्यानंतर उदयनराजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजकुमार जैन यांना मारहाण केली आणि काही ऐवज काढून घेतला, अशी तक्रार जैन यांनी सातारा पोलीस स्टेशनला दिली त्यानंतर उदयनराजे आणि सहका-यांवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.