टंकलेखन, लघुलेखन संघटनांकडून संगणक क्रांती दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 02:07 AM2020-08-10T02:07:38+5:302020-08-10T02:07:42+5:30

राज्यात संगणक टंकलेखन संस्था सुरू करण्याचे आवाहन

Typing, shorthand organizations celebrate Computer Revolution Day | टंकलेखन, लघुलेखन संघटनांकडून संगणक क्रांती दिन साजरा

टंकलेखन, लघुलेखन संघटनांकडून संगणक क्रांती दिन साजरा

Next

अहमदनगर : मॅन्युअल टंकलेखन, लघुलेखन बंद झाल्यानंतर राज्यातील सर्वच टंकलेखन संस्थांपुढे उपजीविकेचा प्रश्न उभा राहिला. परंतु २०१३ मध्ये तत्कालीन शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या पुढाकारातून संगणक टंकलेखन, लघुलेखनास मान्यता मिळाली. तेव्हापासून ९ आॅगस्टलाया संस्थांकडून संगणक क्रांती दिन साजरा केला जातो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व संस्थांनी आॅनलाईन संवाद साधत संगणक क्रांती दिन साजरा केला.

टंकलेखन, लघुलेखन शासनमान्य संस्थांच्या संघटनेचे राज्याध्यक्ष प्रकाश कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरमधून आॅनलाईन पद्धतीने राज्यभरातील संस्थांनी संगणक क्रांती दिन कार्यक्रमाचे आयोजन केले. गुगल मिटद्वारे झालेल्या या वेबिनारमध्ये २५० जण, तसेच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हजारो संस्थाचालक यात सहभागी झाले. परीक्षा परिषदेने टंकलेखन संस्था सुरु करण्याची परवानगी दिली आहे. काही जिल्ह्यांत जिल्हाधिकारी परवानगी देत नाहीत. त्यांना परीक्षा परिषदेचे आदेश दाखवून संस्थांनी प्रवेश सुरू करावेत, असे आवाहन कराळे यांनी केले.

राजेंद्र दर्डा यांच्याप्रति कृतज्ञता
मॅन्युअल टंकलेखनाचे रूपांतर संगणक टंकलेखनात करण्यात तत्कालीन शिक्षणमंत्री व ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांचा मोठा वाटा आहे. २०११ मध्ये टंकलेखन संघटनेचे सुवर्णमहोत्सवी अधिवेशन नगरला झाले. त्यात दर्डा यांनी टंकलेखन संस्थांच्या पाठिशी उभे राहण्याचा शब्द दिला व तो खरा करून दाखवला. याबद्दल संघटनेचे अध्यक्ष कराळे यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी या आॅनलाईन कार्यक्रमात दर्डा यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

Web Title: Typing, shorthand organizations celebrate Computer Revolution Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.