शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

दर्शनासाठी दुतर्फा गर्दी

By admin | Updated: June 24, 2014 23:32 IST

विठुनामाचा गजर करीत लोणी काळभोर ते यवत हा सुमारे 28 कि.मी.चा मोठा टप्पा पार करीत संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवतमधील श्री काळभैरवनाथ मंदिरात विसावला.

यवत : विठुनामाचा गजर करीत  लोणी काळभोर ते यवत हा सुमारे 28 कि.मी.चा मोठा टप्पा पार करीत संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवतमधील श्री काळभैरवनाथ मंदिरात विसावला. 
दौंड तालुक्यात पालखीचे आगमन झाल्यानंतर ठिकठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी पुणो-सोलापूर महामार्गाच्या दुतर्फा गर्दी केली होती. सहजपूर फाटा, जावजीबुवाची वाडी, खामगाव फाटा, कासुर्डी फाटा आदी ठिकाणी पालाखीने विसावा घेत मार्गक्रमण केले. आजचे पालखीच्या दोन मुक्कामामधील अंतर जास्त असल्याने काहीसा थकवा जाणवत होता. पालखीचे बैलदेखील थकले होते. रात्री साडेआठच्या सुमारास पालखीचे यवतमध्ये आगमन झाले. यवतमध्ये मुक्कामाची जय्यत तयारी करण्यात आली होती.
यवतमध्ये पालखीचे स्वागत भीमा-पाटस कारखान्याचे संचालक सुरेश शेळके, पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड, सरपंच श्याम शेंडगे, उपसरपंच नाथदेव दोरगे, सदानंद दोरगे, काळभैरवनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष नानासाहेब दोरगे, शंकर दोरगे, दशरथ खुटवड, गुलाबराव खुटवड, सहायक पोलीस निरीक्षक विनोद घुगे, बबन दोरगे, गणपत दोरगे, खंडू दोरगे, सर्व ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. यवत ग्रामपंचायतीच्या वतीने वारक:यांना विशेष सुविधा देत अंघोळीसाठी 5क्क् पेक्षा जास्त तोटय़ाची सोय केली होती, तर मोबाईल चाजिर्ंगसाठी खास बूथ तयार करण्यात आला होता. सालाबादप्रमाणो यंदाही यवत ग्रामस्थांनी पिठले-भाकरीची पारंपरिक मेजवानी दिली. हजारो भाकरी तयार करण्यात आल्या होत्या.
 
तुकाराम महाराज पालखी यवतकडे मार्गस्थ
लोणी काळभोर : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा लोणी काळभोरचा मुक्काम आटोपून सकाळी यवतकडे मार्गस्थ झाला. ग्रामस्थांनी लोणी फाटय़ार्पयत जाऊन पालखीला निरोप दिला.   या सोहळ्यामध्ये  देहू ते पंढरपूर पालखी मार्गावर चिंचवड येथील ज्योती कोल्हे व प्रवीण मोटे ही बहीण-भावंडे रांगोळीच्या आकर्षक पायघडय़ा घालून सेवा करीत आहेत. 
मंगळवारी सकाळी पालखी सोहळ्यातील वारक:यांनी योगिनी एकादशीचा उपवास सोडला. पालखी सोहळा सकाळी 8 वाजता पंढरपूरच्या दिशेने लोणी काळभोर येथील मुक्काम आटोपून पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. या वर्षी या सोहळय़ामध्ये एकूण 33क् दिंडय़ा सहभागी झाल्या आहेत. त्यामध्ये 27 दिंडय़ा रथापुढे, तर 3क्3 दिंडय़ा रथामागे आहेत.
अद्याप पाऊस न पडल्याने पेरण्या झाल्या नाहीत. त्यामुळे या वर्षी वारक:यांची संख्या कमी असल्याची माहिती सोहळा प्रमुख सुनील मोरे यांनी दिली. पालखी थेऊरफाटा येथे आली तेथे थेऊरचे सरपंच नवनाथ काकडे, माजी ग्रामपंचायत सदस्य महादेव काकडे, रामभाऊ कुंजीर, यशवंतचे कामगार नेते तात्या काळे, ज्ञानोबा किसन कुंजीर, कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे आदींनी सोहळ्याचे स्वागत केले. या ठिकाणी थेऊर ग्रामपंचायत व रामकृष्णहरी सहकारी पतसंस्था, तसेच राईज अॅण्ड शाईन कंपनीच्या वतीने पाणी व केळीचे वाटप केले. 
 
4कुंजीरवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष भोंडरे व उपसरपंच संतोष कुंजीर यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. तसेच,  माजी पंचायत समिती सदस्य हिरामण काकडे, पृथ्वीराज काकडे स्वागतासाठी उपस्थित होते.  हा सोहळा पुढे मार्गस्थ झाला तेव्हा पेठ गावच्या हद्दीत अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे व्यवस्थापक अनिल श्रीवास्तव, दीपक करंजकर, संजीव केदारी, अनिल जिंदाल व इतर अधिकारीवर्ग, ग्रामपंचायत पेठच्या वतीने बापू चौधरी व किशोर शिंदे यांनी या सोहळ्याचे स्वागत केले.  
4या वेळी तंटामुक्तीचे जिल्हा समन्वयक रघुनाथ चौधरी उपस्थित होते. पालखी सोहळा दुपारच्या विसाव्यासाठी उरुळी येथे पोहोचला. त्या वेळी सरपंच दत्तात्रय कांचन, उपसरपंच संगीता लोंढे, ग्रामविस्तार अधिकारी संपत खरपुडे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी स्वागत केले.