शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बँकेच्या थकबाकीने दोन भावंडांनी केले विषप्राशन

By admin | Updated: February 4, 2015 01:51 IST

एकाचा मृत्यू, दुस-याची मृत्यूशी झुंज.

वाशिम - ट्रॅक्टरसाठी घेतलेले कर्ज काही प्रमाणात फेडल्यानंतर पुढे कर्जमाफीच्या घोषणेत उर्वरित कर्ज माफ झाले. बँकेनेही तसे रीतसर कळविले; परंतु काही दिवसां पूर्वीच अव्वाच्या सव्वा रक्कम भरण्यासंदर्भात बँकेमार्फत वकिलाची नोटीस मिळाल्याने दोन शेतकरी भावंडांनी विष प्राशन केले. यातील एकाचा मृत्यू झाला, तर दुसर्‍याची मृत्यूशी झुंज सुरूआहे. या घटनेमुळे बँकेच्या कामकाजाबाबत शेतकर्‍यांमध्ये तीव्र रोष पसरला आहे.अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम तालुक्यातील सायखेडा येथील गोविंद शिवराम गावंडे यांनी सन २00४ मध्ये ट्रॅक्टर घेण्यासाठी महाराष्ट्र बँकेच्या उकळी पेन शाखेकडून ४ लाख ८४ हजार रुपये कर्ज घेतले होते. या कर्जाची नियमित परतफेड ते करीत होते. सन २00८ मध्ये ह्यपंतप्रधान पॅकेजह्णमध्ये हे कर्ज माफ करण्यात आले, अशी रीतसर माहिती गावंडे यांना कळविण्यात आली. आता तब्बल सात वर्षांनंतर जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यात गावंडे कुटुंबीयांना ११ लाख ९५ हजार रुपयांची थकबाकी असल्याचे कळवून त्याचा भरणा सात दिवसांच्या आत करण्याची ताकीद बँकेकडून देण्यात आली होती. या प्रकाराने गोविंद गावंडे यांची तरुण मुलं राजू (३५) आणि संजय गोविंद गावंडे (३0) ही चक्रावून गेली. त्यांनी बँकेचे कार्यालय गाठून चौकशी केली. ही रक्कम भरावीच लागेल, असे तेथील अधिकार्‍यांनी त्यांना सांगितले. या प्रकारामुळे गावंडे कुटुंब प्रचंड तणावात होते. त्यातच २५ जानेवारी रोजी राजू आणि संजय या दोन्ही भावांनी विष प्राशन केले. हा प्रकार घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी ताततडीने त्यांना रुग्णालयात हलविले; परंतु प्रकृती नाजूक असल्याने दोघांनाही अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवार, १ फेब्रुवारीला संजय गावंडे यांची प्राणज्योत मालवली, तर राजू गावंडे यांची प्रकृतीही अत्यवस्थ असल्याचे समजते.