शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात आणखी दोन शेतक-यांच्या आत्महत्या

By admin | Updated: December 4, 2014 02:35 IST

नापिकी आणि कर्जाला कंटाळून मराठवाड्यातील आणखी दोन शेतकऱ्यांनी स्वत:ला संपविले तर एकाने पेटवून घेतले.

सेनगाव, (जि. हिंगोली)/ लोहारा (जि. उस्मानाबाद) : नापिकी आणि कर्जाला कंटाळून मराठवाड्यातील आणखी दोन शेतकऱ्यांनी स्वत:ला संपविले तर एकाने पेटवून घेतले. ९० टक्के भाजलेला हा शेतकरी रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. गेल्या तीन दिवसांत मराठवाड्यात १४ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे़ दाताडा खुर्द (जि. हिंगोली) येथील कानबा जयाजी सरगड (४०) यांना चार एकर शेती असून, शेतात नापिकी झाली. खाजगी सावकाराचे कर्ज डोक्यावर असताना मुलीचे लग्न कशाने करावयाचे? या विवंचनेत ते १ डिसेंबरपासून घर सोडून गेले होते. बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास गावातीलच एका शेतात त्यांचा मृतदेह आढळला. विषारी औषध प्राशन करून त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आहे. दुसऱ्या घटनेत हिंगोली जिल्ह्णातील धोतरा येथील रामभाऊ ढोणे (५५) यांनी दोन एकर जमिनीत सोयाबीन घेतले. लागवड खर्चही निघाला नाही. हैदराबाद बँकेत जमीन गहाण ठेवून ३ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्याचे व्याज वाढत असताना पुन्हा १ लाखाचे कर्ज काढले. भविष्याच्या चिंतेत २७ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता राहत्या घरी विष प्राशन केले. त्यांना हिंगोली येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान २ डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. रामभाऊ ढोणे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, विधवा बहीण असे कुटुंब आहे. उस्मानाबाद जिल्ह्णातील लोहारा येथील मनोहर लक्ष्मण यल्लोरे (५६) यांनी मंगळवारी रात्री रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ते सुमारे नव्वद टक्के भाजले आहेत. त्यांना उस्मानाबाद येथील जिल्हा रूग्णालयात दाखल केले असून, ते मृत्यूशी झुंज देत आहेत़ मनोहर यल्लोरे यांच्याकडे साडेबारा एकर जमीन आहे. त्यांच्या कुटुंबात आई, पत्नी, एक विवाहीत मुलगा, मुलगी व अविवाहीत मुलगा असा परिवार आहे. मनोहर यल्लोरे यांचे वडील लक्ष्मण यांनी विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडून २००८ रोजी ६८ हजार ५०० रूपये कर्ज घेतले होते. २००९ मध्ये हे कर्ज थकीत गेले व यानंतर वडिलांचाही मृत्यू झाला. सद्यस्थितीत या कर्जापोटी ६८ हजार ५०० रूपये मुद्दल आणि ५३ हजार ४३० रूपये व्याज असे एकूण १ लाख २१ हजार ९३० रूपये देणे आहे. (प्रतिनिधी)